धक्कादायक : भाऊबीजेच्या दिवशीच जिल्हा शोकमग्न, जिल्हा रुग्णालयास भीषण आग मृतांचा आकडा ११

0
13

मुख्य संपादक : भारत पवार ,मो. 9158417131   अहमदनगर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आय सी यू विभागास सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून अचानक लागलेल्या आगीत गुदमरून ११ जण मृत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतांमध्ये सिताराम दगडू जाधव, राम किसन हरगुडे, कडुबाई गंगाधर खाटीक, सत्यभामा शिवाजी घोडे चौरे ,शिवाजी सदाशिव पवार ,आसराबाई गोविंद नागरे ,कोंडाबाई मधुकर कदम, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे व अन्य दोन मृतांची नावे समजू शकले नाही. ऐन भाऊबीज सणाच्या दिवशीच आग लागल्याने अहमदनगर जिल्हा शोकमग्न झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.आय सी. यू.मध्ये दाखल केलेल्या रुग्णांवर उपचार सुरू होते हे सर्व रुग्ण कोरोणा बाधित असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.तर २० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आग इतकी भीषण होती की आगीचे लोळ प्रचंड प्रमाणात आकाशात भिडल्याचे दिसत होते. छायाचित्रावरून आपणास याची कल्पना येईलच.अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शॉकसर्किट ने आग लगल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देणार असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.तर हसन मुश्रीफ तातडीने नगर जिल्ह्यात रवाना : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर येथे असताना त्यांना रुग्णालयाच्या आगी ची खबर मिळतात कार्यक्रम सोडून कोल्हापूरहून नगरकडे रवाना झाल्याचे कळते. नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी याबाबत बोलताना सांगितले की जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते तरीही दुर्दैवी घटना घडली याबाबत चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here