मी लस… घेनारही नाही इंदुरीकर महाराज बोलले !आरोग्य मंत्री नाराज झाले ?

0
17

मुख्य संपादक : भारत पवार ,   ९१५८४१७१३१                      घोटी – क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ विशेष प्रतिनधी _ प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी करोना लसी बद्दल घोटी येथील कार्यक्रमात आश्चर्यचकित  विधान केल्याने मोठीीी  खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेेश टोपे नाराज झाल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यातील घोटी ह्या गावी एका कार्यक्रमात “मी लस घेतलीी नाही आणि घेणारही नाही ” असेेआश्चर्यचकित विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोपाळराव गुळवे यांच्या ८१ व्या जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी महाराजांनी वरील वक्तव्य केले होते. इंदुरीकर महाराजांनी तुलसी चे महत्व पटवून देणे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे म्हणाले इंदुरीकर महाराज हे माझ्या अत्यंत जवळचे परिचयाचे असून ते उत्कृष्ट पद्धतीने समाज प्रबोधन करतात कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देतात त्यामुळेच त्यांच्या कीर्तनात लोकांची गर्दी असते. म्हणून त्यांना (इंदुरीकर महाराज ) जागतिक स्तरावर लसी ला असलेले महत्त्व समजावून सांगेन असेही टोपे यांनी सांगितले.

ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का ? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे मी सगळीकडे फिरतो मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय ? असा प्रश्न महाराज आणि उपस्थित करून करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. राम १४ वर्ष वनवासात गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते इथे तर राम १४ दिवस कोरणटन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे. याआधी सुद्धा प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज , इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. इंदुरीकर महाराज यांनी महिलांबाबत आक्षपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादी वरून संगमनेर कोर्टात पी सी पी एन डी टी अंतर्गत इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सम तिथीला स्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्रीसंग केल्यास मुलगी होते असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.तेव्हाही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here