June 27, 2022

वसंतदादा पाटील सह.साखर कारखान्याचे टर्बाइन पार्ट नेण्याचा डाव उधळला

1 min read

देवळा _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : भारत पवार _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे टर्बाइन व अल्टीमेटर खोलून स्व मालकीच्या धाराशिव येथे घेऊन जाण्याचा डाव वसाकाचे माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर आणि राष्ट्रवादीचे माजी देवळा तालुकाध्यक्ष पंडित बापू निकम यांनी उधळून लावला.येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना २५ वर्ष भाडे तत्वावर चालविण्यास घेणाऱ्या धाराशिव कारखान्याच्या काही संचालकांनी डाव आखून दीड कोटी रुपयांचा टर्बाइन व अल्टिमेटर खोलून अन्य कारखान्यासाठी नेण्याचा डाव होता. हि माहिती सर्वत्र वेगाने पसरल्याने परिसरातील काही जागृत नागरिकांनी वसाकाचे माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर व राष्ट्रवादीचे पंडितराव बापू निकम यांच्या कानावर सदरचा प्रकार सांगितला असता त्यांनी लगेच कारखाना स्थळावर हजर होऊन याविषयी धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खरे,जनरल मॅनेजर पठाण यांचे कडे चौकशी केली असता सदर टर्बाइन व अल्टीमेटर आम्ही चालवत असलेल्या सहकारी साखर कारखान्यावर नेत आहोत.काम झाले की काही दिवसांनी परत घेऊन येऊ असे सांगितले. मात्र आहेर यांनी शिखर बँकेने कारखाना चालवायला दिला आहे या कारखान्याचे स्पेअर पार्ट इतरत्र नेण्यासाठी नाही असे त्यांना ठणकावून सांगितले. तेव्हा धाराशिव संचालकांनी गप्प बसण्याची भूमिका घेतली. अशाप्रकारे धाराशिव वाल्यांचा डाव उधळून लावला .तर वसाकाचा स्पेअर पार्ट सभासदांच्या परवानगी शिवाय नेल्यास सभासद धरणे आंदोलन करतील असा इशारा शांताराम तात्या आहेर व पंडित बापू निकम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.