पंकजा मुंडे _ सुहास कांदे भेटीची राजकारणात चर्चेचा गोडवा …
1 min read
नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ विशेष प्रतिनिधी _ नाशिक येथे अनेक विध कार्यक्रम व भूमिपूजन समारंभ प्रसंगी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे नुकताच दौरा केला प्रसंगी संदर्भ सेवा हॉस्पिटलच्या नूतन इमारतीच्या कार्यक्रमा प्रसंगी मुंडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ एकाच मंचार उपस्थित होते यावेळी मुंडे यांनी भुजबळ यांच्या विषयी जाहीर भाषणातून कौतुक करून ते माझ्या वडिलान समान असल्याचे सांगितले होते.असे असले तरी छगन भुजबळांचे राजकारणातील कट्टर विरोधक असलेले नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या घरी जाऊन पंकजा मुंडे यांनी भेट दिल्याने राजकारणात चर्चेचा गोडवा जोरदार वाढला आहे.तर अनेक तर्कवितर्कांना उत आला आहे. कांदे आणि भुजबळ यांच्यात सद्या संघर्षाची ठिणगी पडल्याने भुजबळ _ कांदे वाद याविषयी राज्यभर चर्चा असून ” डीसीपीसी ” चा निधी वाटपावरून भुजबळांच्या विरुद्ध कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत निधीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे मुंडे आणि कांदे यांच्या भेटी मागचे गुपित काय ? ह्या चर्चेने वातावरण ढवळून निघाले आहे.तर अनेक तर्कवितर्कांना उत आला आहे.ह्या भेटी मुळे कांदे यांना अधिक बळकटी मिळणार की काय ? अशीही चर्चा रंगू लागली .
