June 27, 2022

व्हेज _ नॉनव्हेज रश्याची लज्जत न्यारी…! देवळा येथील नाशिक रस्त्यावरील हॉटेल दुर्गा लई भारी…!!

1 min read

दुर्गा हॉटेल चे संचालक श्री.संदेश दिगंबर गुंजाळ

देवळा :_ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ काही गावांना स्वतःची एक वेगळी पण आदर्श अशी ओळख असते.ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे देवळा शहरातील नाशिक हाय वें लगत असलेल्या हॉटेल दुर्गा स ऐक वेगळी पण सणसणीत रस्स्याची ऐक खास ” चव ” आहे. मग तो रस्सा व्हेज ( शाकाहारी ) असो की नॉनव्हेज ( मांसाहारी ) असो .देवळा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील मराठमोळ्या चवदार जेवणाचा झणझणीत रश्या ची चव जिभेवर घेतल्या शिवाय खवय्यांचे मन तृप्त होणार नाहीच.मग ती मटणाची भाजी असो किंवा व्हेज मधील कोणत्याही प्रकारची भाजी असो कि त्यापुढे मिसळीची चव फिकी पडावी .त्यामुळे आजवर अनेक खवय्यांनी हॉटेल दुर्गाच्या चवदार जेवणाची कमाल असलेला रश्यास सलाम ठोकला तो यामुळेच.व्हेज _ नॉन व्हेज ह्या बाबतीत हॉटेल दुर्गा मध्ये जेवणास येणाऱ्या ग्राहकास हॉटेल दुर्गाचे जेवण हे ग्राहकांच्या जीवनाचा अविभाज्य  घटक बनले आहे.

असे झकास जेवण झाले की म्हणाल एकदम कडक ….अशी समाधान कारक आणि पुन्हा जेवणास येऊ अशी आश्वासक प्रतिक्रया ग्राहक व्यक्त करतात ,ती जेवण करून तृप्त झालेले आमचे ग्राहक अशी माहिती अनेक खवय्येगिरी नी दिली.याबाबत हॉटेल दुर्गा चे संचालक श्री.संदेश दिगंबर गुंजाळ यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की ग्राहक जेवण करून तृप्त कसे होतील.त्यांना समाधान कसे मिळेल ? ह्या गोष्टीचे विचार करूनच मी आमच्या हॉटेल दुर्गा चे नाव जिल्ह्याबाहेर पोहचविले.ते असे की माझे हॉटेल देवळा येथील रामेश्वर फाटा नजिक नाशिक हायवे ला अगदी लागून आहे.त्यामुळे आमच्या हॉटेल मध्ये स्थानिक आणि नाशिक जील्ह्या बरोबरच देश _ प्रदेशातील नागरिक जेवणा साठी येत असतात.आणि हॉटेल दुर्गा मधील जेवणाची चव व्हेज – नॉन व्हेज रश्याची लज्जत न्यारी असून त्यामुळे ही आमची नवलाई परदेशात सुद्धा पोहचली असल्याचे संदेश गुंजाळ यांनी यावेळी सांगितले. हॉटेल दुर्गा ने आपल्या चवीचे १५ व्या वर्षात पदार्पण केले असून चवीत तसूभर सुद्धा फरक न पडता नाव लौकिक मिळविला आहे.त्यामुळे देवळा येथील नाशिक हायवे लगत असलेल्या हॉटेल दुर्गा ” लई भारी ” असे आमचे ग्राहक अभिमानाने तृप्त होऊन सांगत असतात.त्यामुळे खवय्येगिरी नी अर्थात आमच्या चोखंदळ ग्राहकांनी दिवाळी सणाची मजा लुटण्यसाठी आणि आपले मन प्रसन्न व तृप्त करण्या साठी हॉटेल दूर्गास एक वेळ अवश्य भेट देऊन खरा खाण्याचा आनंद लुटावा तो हॉटेल दुर्गा मधील अस्सल व्हेज किंवा नॉनव्हेज चमचमीत रश्यासंगे ….!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.