ऐन दिवाळीच्या तोंडावर भररस्त्यात मालेगावात गोळीबार

0
39

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ मालेगाव आणि मालेगाव तालुक्यातील जनता कोरोना महामारी पासून मुक्त होत असताना त्यामुळे काही अंशी आनंदात दिवाळी सणाच्या निमित्ताने आपापल्या कामात व्यस्त असताना रात्री च्या वेळी येथील कुसुंबा रोड वरती गोळीबार झाल्याने येथील नागरिकात घबराहट पसरली होती.मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हललेखोरांच्या मुसक्या आवळल्या.याबाबत समजलेली हकीकत अशी की पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून अश्फाक शाह मुक्तार शाह यास अवलिया मशिदी जवळ सय्यद इस्माईल उर्फ इरफान काल्या यानेे अशपाक शाह याच्या पोटाच्या दिशेने गावठी कट्टा काढून गोळी बार केला अशपाक याने वेळीच जोरदार हलचाली करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला म्हणून गोळी त्याच्या कमरेला लागली.यावेळी रस्त्यावरील नागरिकात एकच गोंधळ उडाला शाह बचावला परंतु जखमी झाल्याने नागरिकांनी त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले.आयेशा नगर व शहर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेऊन उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि काही वेळातच संशयित आरोपी सय्यद इस्माईल उर्फ इरफान काल्या आणि त्याचे साथीदार यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.त्यांना पकडून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.रात्री उशिरा आयेशा नगर पोलिस ठाण्यात काल्याची रवानगी करण्यात आली.पोलिस अधीक्षक सचिन पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आयशा नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here