भोसलेंच्या भोसलेगिरी मुळे देवळा तालुक्यात संताप गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली मागणी

0
20

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ भारत पवार : भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी पद्मविभूषण व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबत बदनामी कारक व आक्षपार्ह विधान केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी  युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यात संताप व्यक्त केला जात असून जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील (गोटू आबा ) आहेर , समता परिषदेचे आबा खैरनार ,राष्ट्रवादी युवक सोशल मीडिया तालुका अध्यक्ष सनी आहेर, विठ्ठल गुजरे ,मयुर सोनवणे ,शिवसेना ग्राहक मंचचे भास्कर अहिरे व किशोर खरोटे यांनी देवळा पोलीस स्टेशन चे ठाणे अमलदार सोनवणे यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भोसले यांनी दि.२७/१०/२०२१ रोजी फेसबुक व सोशल मीडिया वरती व्यसनाधीनतेमुळे दस्तरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागले यांसारखे आक्षपार्ह व बदनामीकारक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बाबत केल्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन जनमानसातील आक्रोश निर्माण झालेला आहे म्हणून तुषार भोसले यांचे विरुद्ध भा द वी कलम ४९९ ,५००,५०४ व माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here