मालेगावी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने जिल्हाआढावा बैठक संपन्न
1 min read

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ स्वाती वाणी _ मालेगवी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने ओबीसी जोडो मोहिमे अंतर्गत व जिल्हा आढावा बैठक येथील या. ना जाधव विद्यालयात संपन्नन झाली. राष्ट्रीयओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव शरद वानखेडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, राष्ट्रीय महिला महासंघ कार्याध्यक्ष अँड ज्योती ताई ढोकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सरकारकडे पुढील मागण्या करण्यात आल्या ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्यात जातिनिहाय जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा,
स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पुर्ववत सुरू करण्या करता समर्पित आयोगाची नियुक्ती करणे या व यासारख्या अनेक मागण्यांबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका यावेळी श्री वानखेडे सरांनी स्पष्ट केली.
ओबीसींनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. महासंघाच्या माध्यमातून शासनाकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या महाराष्ट्र शासनाकडे ३४ व केंद्र सरकारकडे २० मागण्या केल्या आहेत असे ते बोलले.तसेच
इतर मागासवर्गीयांना मागासवर्गीयांप्रमाणे सवलती मिळायला हव्यात असे आग्रही प्रतिपादन केले. व्यासपीठ हे विचारपिठ बनावे यासाठी प्रयत्नशील असावे असेही त्यांनी सुचविले. केंद्र सरकारकडे पुढील मागण्या करण्यात येत आहेत. ओबीसीची जातिनिहाय जनगणना, आरक्षणाची ५० % मर्यादा रद्द करणे, २७ % राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, याही मागण्यांचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही आजच्या एकुण लोकसंख्येच्या ६०-६५ टक्के ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यातसाठी आणि ओबीसी समाजाच्या घटनात्मक मागण्यांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष केंद्रित करून त्या पुर्ण करून घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ कार्य करीत आहे.
मालेगावातील सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी रमेश उचित, सुनिल वडगे, विजय भावसार, शरद दुसाने, राजेंद्र आहिरे, प्रवीण वाणी, रविराज सोनार, अशोक पठाडे, विलास वडगे, मनोहर वैद्य, शाबान तांबोळी, राजेंद्र चौधरी, राजीव वडगे, बाळासाहेब पवार, मयुर वांद्रे आदींसह ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ओबीसी महिला महासंघाच्या सुनीता येवले, आशालता महाजन, चेतना शिरुडे, रुपाली शेलार, अनिता वाडेकर, मनिषा आहिरे, मंजुषा कासार, रूपाली कासार, राजश्री अमृतकर, आशा खैरनार, वैशाली महाजन आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष स्वाती प्रवीण वाणी यांनी केले. अतिथी परिचय मालेगाव तालुका उपाध्यक्ष अलका भावसार, आशा सोनवणे, अॅड सुचित्रा सोनवणे व कळवण तालुकाध्यक्ष दीपाली बच्छाव यांनी करून दिला.
मालेगाव तालुकाध्यक्ष जयश्री धामणे यांनी आभार मानले. शहराध्यक्ष हर्षिता आहिरे यांनी सुत्रसंचलन केले.मालेगाव- राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने ओबीसी जोडो मोहिमे अंतर्गत व जिल्हा आढावा बैठक संपन्न मालेगाव येथील या. ना जाधव विद्यालयात संपन्न झाली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव शरद वानखेडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, राष्ट्रीय महिला महासंघ कार्याध्यक्ष अँड ज्योती ताई ढोकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सरकारकडे पुढील मागण्या करण्यात येत आहे. ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्यात जातिनिहाय जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा,
स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पुर्ववत सुरू करण्या करता समर्पित आयोगाची नियुक्ती करणे या व यासारख्या अनेक मागण्यांबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका यावेळी श्री वानखेडे सरांनी स्पष्ट केली.
ओबीसींनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. महासंघाच्या माध्यमातून शासनाकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या महाराष्ट्र शासनाकडे ३४ व केंद्र सरकारकडे २० मागण्या केल्या आहेत असे ते बोलले.तसेच
इतर मागासवर्गीयांना मागासवर्गीयांप्रमाणे सवलती मिळायला हव्यात असे आग्रही प्रतिपादन केले. व्यासपीठ हे विचारपिठ बनावे यासाठी प्रयत्नशील असावे असेही त्यांनी सुचविले. केंद्र सरकारकडे पुढील मागण्या करण्यात येत आहेत. ओबीसीची जातिनिहाय जनगणना, आरक्षणाची ५० % मर्यादा रद्द करणे, २७ % राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, याही मागण्यांचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही आजच्या एकुण लोकसंख्येच्या ६०-६५ टक्के ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यातसाठी आणि ओबीसी समाजाच्या घटनात्मक मागण्यांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष केंद्रित करून त्या पुर्ण करून घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ कार्य करीत आहे.
मालेगावातील सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी रमेश उचित, सुनिल वडगे, विजय भावसार, शरद दुसाने, राजेंद्र आहिरे, प्रवीण वाणी, रविराज सोनार, अशोक पठाडे, विलास वडगे, मनोहर वैद्य, शाबान तांबोळी, राजेंद्र चौधरी, राजीव वडगे, बाळासाहेब पवार, मयुर वांद्रे आदींसह ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ओबीसी महिला महासंघाच्या सुनीता येवले, आशालता महाजन, चेतना शिरुडे, रुपाली शेलार, अनिता वाडेकर, मनिषा आहिरे, मंजुषा कासार, रूपाली कासार, राजश्री अमृतकर, आशा खैरनार, वैशाली महाजन आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष स्वाती प्रवीण वाणी यांनी केले. अतिथी परिचय मालेगाव तालुका उपाध्यक्ष अलका भावसार, आशा सोनवणे, अॅड सुचित्रा सोनवणे व कळवण तालुकाध्यक्ष दीपाली बच्छाव यांनी करून दिला.
मालेगाव तालुकाध्यक्ष जयश्री धामणे यांनी आभार मानले. शहराध्यक्ष हर्षिता आहिरे यांनी सुत्रसंचलन केले.