कोरोना चे सावट असल्याने ईदच्या मिरवणुकीस परवानगी नाही ? _ चंद्रकांत खांडवी
1 min read

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज 🙁 भारत पवार , मुख्य संपादक , मो. 9158417131 ) _ मालेगाव येथे सणांची रेलचेल जोरात सुरू असली तरी कोरोनाचे सावट अद्यापही असल्याकारणाने शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार आणि सूचना नुसारच मोहरम , गणेशोत्सव , नवरात्र उत्सव साजरे करण्यात आले आहेत.येत्या १९ ऑक्टोबरला हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद – ए – मिलाद सण म्हणून साजरा करण्यात येणार असल्याने सद्या कोरोना महामारी चे सावट कायम असल्याने शासनाकडून ईदच्या मिरवणुकी परवानगी नाकारले जाण्याची शक्यता असल्याने शासनाच्या नियमांच्या व सूचनांचे पालन करून सण साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी मालेगाव वासियांना केले आहे. सध्या सुरू असलेल्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुन्नी संघटना व शांतता समिती सदस्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. शासनाने काही अंशी निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोना चे सावट कायम असल्याकारणाने मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सण साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जर शासनाने सणाच्या आधी नवीन निर्देश जारी केले तर तात्काळ सुन्नी संघटना प्रतिनिधी ची बैठक बोलावली जाईल असेही खांडवी यांनी सांगितले. बैठकीस पोलीस उपअधीक्षक लता दोंदे ,मनपाचे सहायक आयुक्त अनिल पारखे, अपर तहसिलदार किशोर मराठे , शहर अभियंता कैलास जाधव, हरिप्रसाद गुप्ता, अतरहर हुसेन अश्रफी , शफिक राणा, अब्दुल सलाम ,जावीद अनवर , साजीद अन्सारी ,माधव जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
