मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : भारत पवार (मुख्य संपादक ) _ मालेगव येथे आज पावेतो अनेक सणांची रेलचेल अत्यंत उत्साहात पार पडले जात आहेत असे असले तरी शासनाने घालून दिलेल्या निर्बंध नुसारच गणेशोत्सव , मोहरम , नवरात्र उत्सव हे सण साजरे झालेत शासनाने काही अंशी निर्बंध शिथिल केले असले तरी अद्याप पावेतो कोरोना चे सावट कायम असल्याने येत्या १९ ऑक्टोबर रोजी मालेगावी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद- ए – मिलाद सण म्हणून साजरा होत असल्याने कोरोनाचे सावट असल्याकारणाने शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे ईद _ ए _मिलाद च्या मिरवणुकीस शासनाकडून परवानगी नाकारली जाण्याची शक्यता असल्याने मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमांचे अधीन राहून सण साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.सुन्नी संघटना व शांतता समितीच्या सदस्यांच्या संयुक्त संयुक्त बैठकीत ते बोलत होते. सणाच्या आधी शासनाने निविन निर्देश जारी केल्यास तात्काळ सुन्नी संघटना प्रतिनिधी ची बैठक बोलावली जाईल असेही खांडवी यांनी सांगितले. बैठकीस पोलीस उप अधीक्षक लता दोंदे , मनपाचे सहायक आयुक्त अनिल पारखे ,अपर तहसिलदार किशोर मराठे ,शहर अभयंता कैलास बच्छाव, हरिप्रसाद गुप्ता ,अतहर हुसेन अश्रफी , शफीक राणा ,अब्दुल सलाम , जावीद अन्वर, साजिदअन्सारी , माधव जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
