सा. बां.विभागाची लाज राखली ,नानू आहेर यांनी स्वखर्चातून रस्ता दुरुस्ती केली

0
70

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ नानू आहेर यांनी आपल्या स्वतःच्या पैशाने रस्ता दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागाची लाज राखून एक आदर्श निर्माण केला आहे. पडणाऱ्या पावसामुळे देवळा शहरातील रस्त्यांची अत्यंत लाजिरवाणी अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे रस्त्यात पडल्यामुळे वाहन चालविणे मोठे कष्टमय झाले असून जीव वाचविण्यासाठी एक आव्हान झाले आहे. रस्त्यात खड्डे पडल्यामुळे नेहमीच लहान-मोठे अपघात होत असतात याची जरासुद्धा लाच संबंधित विभागास नसल्यामुळे वाहनधारक आत तीव्र संताप व्यक्त केला जात होता. योगेश उर्फ नानू आहेर यांनी नुकतेच नवीन जेसीबी मशीन घेतल्याने त्यांनी स्वतःहून देवळा पाच कंदील ते मालेगाव नाका पर्यंत रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे त्यात मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती केली.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची लाज राखली गेली अशी चर्चा देवळा शहरात रंगली असून आतातरी याचे भान ठेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी होऊ लागली आहे. खड्डे बुजल्या मुळे अर्धा किलो मीटर का होईना वाहन चालविणे सोयीचे झाले असून वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे नानू आहेर यांचे सर्वत्र कौतुक होत असून आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून नवीन जेसीबी  चा शुभारंभ करण्यात येऊन रस्ता दुरुस्ती केल्याने अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होणार असेही योगेश उर्फ नानू आहेर व मनु आहेर यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here