सद्या इडी ची अवस्था रस्त्यावर चलन कटनाऱ्या प्रमाणे _ खा.सुप्रियाताई सुळे

0
42

औरंगाबाद : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जगदीश काशीकर _ द्या ईडीची अवस्था रस्त्यावर चलन कटणाऱ्याप्रमाणे असल्याची बोचरी टिका खा.सुप्रियाताई सुळे यांनी केली.

 

 

 

 

मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही ताईंनी केला आहे.

 

खा.सुप्रियाताई सुळे यांनी औरंगाबादमध्ये असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर टीका केली. मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. पण आज रस्त्यावर चलन कटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था करण्यात आली आहे, असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

 

ईडी कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? हे कोणत्या आधाराने बोलातात? हे काय सीपी किंवा आयजी आहेत की ईडीचे अध्यक्ष आहेत का? मग हे कसं बोलतात?, असा सवाल करतानाच पाच दशकात आमच्यावरही आरोप झाले. पण आमची तयारी आहे. इतकी कटुता येणं योग्य नाही. आमच्या विरोधात ट्रक भर पुरावे आणले पण काय झालं? असा सवालही त्यांनी केला. प्रेस हाऊसवर सुद्धा रेड होते. त्यांना नोटीस दिली जाते, याकडेही ताईंनी लक्ष वेधलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here