मानवतेची सेवा हाच आमचा धर्म ,पूरग्रस्त कोकण वासियांना मदत पाठविणे हेच भाईजी फाऊंडेशनचे कर्म !
1 min read
40706 ह.पुढील वाचक संख्या असलेले निर्भिड लेखणीचे महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात रुजलेले फास्ट क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा : संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मालेगाव _ प्रतिनिधी _मालेगाव येथील भाईजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे पुरग्रस्त कोकण वासीयांना 500 कुटुंबियांना जीवन आवश्यक वस्तु ची मदत पाठविण्यात आल्या चे संस्थापक राहुल पवार यांनी सांगितले . स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तसेच भाईजी फाउंडेशन वर्धापन दिना निमित्ताने मानवतेची सेवा हाच आमचा धर्म आसा विचार डोळ्यांसमोर ठेऊन आपले कर्तव्य समजुन 14 ऑगस्ट रोजी रात्री तिरंगा झेंडा दाखवत गाडी महाड व चिपळुनकड़े रवाना झाली.
१५ ऑगस्ट रोजी महाड येथे मंजरी, फार्मसी , वरन , दासगांव बौध्दवाडी, आदिवासीवाडी, चिपळुन ,पतरावाडी, टेंगर इत्यादी गांवामध्ये पूरग्रस्त नागरीकांना जीवनावश्यक लागणारे साहित्य, कपड़े ,किराणा या प्रकारचे भाईजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मालेगाव तर्फे देण्यात आले.
समाजउपयोगी उपक्रमात मालेगाव शहरातील नावाजलेले इंडियन ब्युटीकचे संचालक केतन दत्तानी , समता परीषदचे धर्मा (आण्णा) भामरे, वंचित बहुजन आघाडीचे कपिल भाऊ आहिरे, व कल्पेश भाऊ सोनार आदित्य भाऊ निकम यूपी ट्रांसपोर्ट संचालक सागर खैरनार व मालेगांव शहरातील मान्यवरांकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे.