मालेगाव : महिला व बाकल्याण समिती सभापती पदी शिवसेनेच्या पुष्पा गंगावणे विराजमान
1 min read
४०६४० ह.पुढील वाचक संख्या असलेले निर्भिड लेखणीचे महाराष्ट्रातील जनतेचे प्रत्येक घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मना मनात रुजलेले फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा ,तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा .संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , मालेगाव _ मालेगाव महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची निवड होऊन समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या पुष्पा राजेश गंगावणे यांची नियुक्ती झाली.त्यामुळे शिवसेनेच्या आणि आर पी आय पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी , उपायुक्त राहुल पाटील , नगर सचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थित ऑनलाइन सभेचे कामकाज पार पडले. सभापती पदासाठी शिवसेनेच्या गंगावणे यांनी तर महागठबंधन आघाडीतर्फे अन्सारी आसफा मो.रशीद यांनी अर्ज दाखल केले होते .माघार कोणीच न घेतल्याने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली गंगावणे यांना राजिया बेगम अब्दुल माजिक , हमीदा शेख जब्बार, शबाना शेख सलीम आणि सुवर्णा राजेंद्र शेलार अशा काँग्रेस व भाजपाच्या पाच सदस्यांनी मतदान केले. अन्सारी आसफा यांना चार मते मिळाली त्यामुळे गंगावणे यांची सभापती म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले.नवनिर्वाचित सभापती पुष्पा गंगावणे यांचा महापौर ताहेरा रशीद शेख, मा.आ.रशीद शेख ,युवासेना विस्तारक अविष्कार भुसे यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला ,तालुका प्रमुख ऍड. संजय दुसाने ,मालेगाव महानगर प्रमुख रामा मिस्तरी ,युवासेना जिल्हा प्रमुख विनोद वाघ , नगरसेवक सखाराम घोडके ,राजाराम जाधव ,जे.पी. बच्छाव ,नारायण शिंदे ,भीमा भडांगे, मोहन तीसगे ,यशपाल बागुल ,गोविंद गवळी , दत्ता चौधरी , अमोल चौधरी , सारंग बोरसे आदी नेते उपस्थित होते. त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.