करोडो देशवासीयांच्या आशीर्वादाने केंद्रात भाजप सरकार आले हीच मोदीजींच्या चांगल्या कामाची पावती. ना.भारती पवार

0
56

40635 ह.पुढील वाचक संख्या असलेले निर्भिड लेखणीचे महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मना मनात असलेले फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा , संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक ” महाराष्ट्र न्यूज ” मो.9158417131

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मालेगाव _ भाजपा तर्फे संपूर्ण भारत भर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत असून महाराष्ट्रातील केंद्रात असलेले मंत्री महोदय आपल्या विभागात जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले आहेत.या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत नाशिक महानगरात वास्तव्यास असलेले आणि केंद्रात केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री पदावर महाराष्ट्रातून एकमेव महिला म्हणून नियुक्ती झालेले डॉक्टर भारती पवार म्हणजे महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आणि आम जनतेचे स्वाभिमान अशा मंत्री महोदय यांनी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रारंभ केला असून त्यांच्या यात्रेस प्रचंड प्रमाणात जनसमुदाय जमत असल्याने भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी काल मालेगाव येथे भेट दिली असता प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उसळला होता. याप्रसंगी बोलताना डॉ.भारती पवार म्हणाल्या की देशातील करोडो देशवासीयांच्या आशीर्वादाने केंद्रात भाजप सरकार आले जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठीच भाजप तर्फे जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत असून आपण उस्फूर्तपणे प्रचंड जनसमुदायाने जमून मला उल्हासित केले आहे. जन आरोग्याच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या केंद्र शासनामार्फत सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून देशातील ५५ कोटी जनतेने लसीकरण पूर्ण केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाचा आढावा रोजच घेत असतात. देशातील नागरिकांचा शेतकऱ्यांचा आणि महिलांचा विश्वास मोदींवर असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मोदींनी केले आहे असे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे मालेगाव महानगरात आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.प.स.सदस्य अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले तर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी यात्रेचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री खा.डॉ.सुभाष भामरे यांनी केंद्र सरकारने केलेल्या कार्याचा आणि आपल्या कारकिर्दीत केलेल्या विकास कामाचा लेखा जोगा मांडला.फुड प्रोसेसिंग हब झाल्यास या भागाचा मोठाच विकास होईल अशी अपेक्षा जन आशीर्वाद यात्रा नियोजन प्रमुख तथा जि.प. सदस्य समाधान हिरे यांनी व्यक्त केली.प्रा.अशोक उइके ,प्रदेश कार्यकारणी सदस्य लकी गिल , तालुका अध्यक्ष नीलेश कचवे , स्वच्छता अभियान प्रदेश संयोजक दादा जाधव ,जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील , जी.प. सदस्या मनीषा पवार , जे. डी.हिरे ,नगरसेवक संजय काळे ,गजू देवरे ,मुकेश झुनझुनवाला ,जिल्हा उपाध्यक्ष हरी प्रसाद गुप्ता, नंदू तात्या सुरेगावकर ,भारत पोफळे, पोपट लोंढे ,बापू वाघ,मिलिंद पवार ,जिल्हा सचिव संदीप पाटील, जी.प.सदस्य अरुण पाटील , सुवर्णा देसले , पप्पू पाटील,सुधीर जाधव, सतीश उपाध्ये ,राहुल पाटील स्वप्नील मराठे,सुनील शेखर ,कुणाल सूर्यवंशी, कमलेश सोनवणे , श्याम गांगुर्डे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here