सुनील गायकवाड यांचे नियोजनार्थ : मालेगाव येथील सटाणा नाक्यावर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे न भूतो न भविष्यती असे जंगी स्वागत

0
21

40633 च्या पुढील वाचक संख्या असलेले निर्भिड लेखणीचे प्रत्येक घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात असलेले फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा : संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज   मो.9158417131

महाराष्ट्र न्यूज ,मालेगाव : येथील सटाणा नाक्यावर केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे न भूतो न भविष्यती असे जंगी स्वागत करण्यात आले.जन आशीर्वाद यात्रा निमित्ताने मालेगावात आलेल्या डॉक्टर पवार यांच्या स्वागताचे व कार्यक्रमाचे नेतृत्व कार्य सम्राट नगरसेवक सुनिल आबा गायकवाड व नगरसेवक मदनबापू गायकवाड यांनी केले होते.यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग ह्या जन यात्रा कार्यक्रमास लाभल्यामुळे आणि जंगी स्वागत झाल्यामुळे केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार अक्षरशः भारावून गेल्या होत्या.असे जंगी स्वागत आणि जन याचा कार्यक्रमास उपस्थित असलेले हजार कार्यकर्ते हे मी पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे पवार यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि ही जबाबदारी  पूर्णपणे पार पाडून पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणार असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. आज पर्यंत केंद्रात आदिवासी समाजासाठी मंत्री म्हणून कोणीही स्थान दिले नव्हते ते स्थान मोदीजींनी आपणास दिल्याने आदिवासी समाजास खरा न्याय भाजप सरकारने दिला असूनमालेगाव महानगराच्या आणि मालेगाव तालुक्याच्या आरोग्य संदर्भात कुठलीही समस्या असो त्यास मी न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन , नगरसेवक सुनील गायकवाड ,मदन गायकवाड यांचे मालेगाव महानगरात अनेक विकास कामे केली असून त्यांच्या विकासकामांची पावती म्हणजे जन आशीर्वाद यात्रेस जमलेला जनसमुदाय यावरून गायकवाड बंधूंची कामाची आणि त्यांच्या कार्याची हातोटी लक्षात येते. आपल्या समस्या ज्या काही असतील त्या समस्या केंद्र शासनामार्फत  सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार असून मालेगाव महानगर आणि तालुक्यातील जनतेस न्याय देणार असल्याचे डॉक्टर पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here