June 27, 2022

करोडो रुपये खर्चून प्रा.आरोग्य केंद्रावर धुळवड , जनतेची होतेय परवड , केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती ताई पवार यांनी भेट देण्याची घ्यावी आवड _ गजानन साळवे

1 min read

40494 च्या पुढील वाचक संख्या असनारे परखड दमदार लेखणी चे महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मना मनात असलेले निर्भिड” फास्ट ” महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा,संपर्क : भारत पवार मुख्य संपादक/संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131

 

 

 

महाराष्ट्र न्यूज : ताहराबाद _ना. भारती ताई , आपण जन आशिर्वाद यात्रे निमित्ताने आपल्या लोकसभा क्षेत्रात ,जिल्हात येत आहात . तसेच ताहाराबाद येथे ही येणार आहेेेेेत ताहाराबाद  येथील गेल्या ५/६ वर्षापासुन करोडो रूपये खर्च करून आयुष्मान भारत योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंन्द ऊद्घाटना अभावी धुळ खात पडले असल्याने येथील जनतेची खूपच परवड होते आहे. आपण ताहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरडा रुपयांचा चुराडा झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था आणि परिसरात असलेले गवत रुपी जंगलाचेे साम्राज्य पाहून जनहिताच्याा दृष्टीने योग्य निर्णय घेऊन समस्त जनतेचीी परवड थांबवावी अशीी  मागणी तहाराबाद येथीलल गजानन पांडुरंग साळवे यांनी पत्राद्वारेे केली आहे. पत्राात त्यांनी म्हटले की , ताई

 

 

 

आपले दिल्लीत ,भारत सरकार केंन्दात आपणास योग्य सन्मान मिळाला व आपल्या समाजसेवेची ,कार्याची दखल घेऊन आपणास केंन्द्रींय आरोग्य राज्यमंत्री बहाल केले हि आमच्चासाठी ,कसमादे परिसरासाठी अभिमानाची बाब आहे . आपण १८ तारखेला कसमादे पट्ट्यात येत आहात .यात आपण ताहाराबाद नगरीत येणार आहात हे समजले  .तरी वरील विषयान्वे ताहाराबाद येथील करोडो रूपये खर्च करून आयुष्मान भारत योजने अंतर्गत भव्य अशी प्राथमिक आरोग्यकेंन्द्रांची ईमारत धुळ खात पडली आहे

तसेच काही महिण्यापुर्वी लोकप्रतिनिधी ,सरकारने व सरकारी यंत्रणेने नावालाच फक्त घोषणा करून ताहाराबाद कोविड सेंटरची घोषणा केली पण काहीच झाले नाही .तरी आपण ताहाराबाद नगरीत येत आहात आपण दोन मिनिटे देऊन आरोग्य केन्द्रांची अवश्य पहाणी करावी आज पुर्ण आरोग्य केन्द्र दुरलक्षित आहे .आरोग्य केन्दात सर्वकडे झाडे ,झुडपे ,गवत ऊगले आहे .तेथील स्टाफला काँटेज मिळत नाही .काँटेज बिल्डिंग अद्यावत बांधलेली आहे पण लाईट व पाण्याची सुविधा नाही . ताहाराबाद हा आदिवासी बहुल भाग आहे हे आपणास सांगण्याची आवश्यकता नाही, येथे असंख्य आदिवासी बांधव ,माता भगिणी ऊपचारासाठी येत असतात .येथे योग्य व महत्वपुर्ण ओषध साठा नाही तसेच महत्त्वाचे गंभीर ,अपघातग्रस्त रूग्नाणा अँम्बुलन्स भेटत नाही तरी आपण आद्यावत अँम्बुलन्स ताहाराबाद केंन्दास द्यावी . भविष्यात कोविड महामारीची तिसरी लाट येऊ नये म्हणुन शासन युध्दपातळीवर ऊपाय योजना करत आहे त्या अनुशंगाने ताहाराबाद येथे अद्यावत कोविड सेंटर केले जाईल असा ठराव शासनाने नुकताच केला पण पुढील कारवाई झालीच नाही तरी या विषयात आपण स्वता लक्ष घालावे व ग्रामीण ,आदिवासी जनतेस शासनाचे हक्काचे आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी मागणी व माफक अपेक्षा गावकर्यां तर्फे साळवे यांनी व्यक्त केली आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.