उत्पादन शुल्काच्या पोलीस निरीक्षकाने नीचपणा चा कळस गाठला जनार्दन गौड बंडी वार कडे पाच लाखाचे मागणी करू लागला मागणी पूर्ण नाही केली म्हणून वर्दी चा माज दाखवला मारहाणीत जनार्दन मृत्यू पावला _आरोप

0
30

परखड, दमदार, निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हककचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस चे निर्भिड ” फास्ट” ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा : संपर्क _ भारत पवार मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर / नाशिक _( देवळा ) _ नरेश सुधा गोणीवार _ संपूर्ण राज्य उत्पादन शुल्काच्या विभागास काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात काल घडल्याने या विभागा विरुद्ध राहता तालुक्यात जनतेत संताप व्यक्त केला जात आहे तर अशा कोल्हे कोई करून माजलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी संबंधित नागरिक जोरदारपणे करीत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी राहाता तालुक्यात जाऊन घटनास्थळी घडलेली हकीकत जाणून घेतली. राहाता तालुक्यातील जनार्धन गौड बंडिवार यांचा कुठलाही प्रकारचा ताडी व्यवसाय नसूनही राहाता बाबळेश्वर येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांनी बळजबरीने जनार्दन यास ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. जनार्दन याचा ताडी किंवा कुठल्याही प्रकारचा अवैध प्रकारचा धंदा नसल्याने पाच लाख रुपयाची निरीक्षकांनी केलेली मागणी पूर्ण करू न शकल्याने जनार्दन गौड बंडेवार यास उत्पादन शुल्काच्या निरीक्षकाने आणि कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले. आणि त्याच वेळी त्या निरीक्षकाची बुद्धी पालटली आणि नीच पणाचा कळस गाठून उत्पादन शुल्काची आणि विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची इज्जत चव्हाट्यावर आणली ती अशी, जनार्धन याची पोलिस कस्टडी घेऊन पैशांची मागणी करू लागले संबंधित अधिकाऱ्यांनी  बाभळेश्‍र येथील यमुना हॉटेल बुक करून त्या हॉटेलचा पोलिस कस्टडी म्हणून वापर करून जनार्दन यास त्या हाटेलात ठेवून आणि संबंधित उत्पादने शुल्काचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांनी मागणी पूर्ण नाही केली म्हणून वर्दीचा माज दाखवला व जनार्दन यास जबर मारहाण करू लागले त्यातच जनार्दन गौड बंडीवार याचा मृत्यू झाला असा आरोप त्याचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने केला असून संपूर्ण राहता तालुक्यात उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी विषयी आणि कर्मचाऱ्यांनी विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून मारहाण करून कोल्हेकुई कुई करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर योग्य तो गुन्हा दाखल करून त्यांच्यावर क कडक कारवाई करून त्यांचा माज जिरवून उत्पादन शुल्काची गेलेली इज्जत वाचावी अशी मागणी संबंधित जनार्दन यांच्या कुटुंबियांच्या वतीने तसेच नातेवाईक , मित्रपरिवार यांचे मुख्यमंत्री गृहमंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक यांचेकडे करण्यात आली असून जनार्दन यांच्या वर झालेल्या अन्याय कारक केलेला अन्याय हा निर्दय असून जनार्धन यांच्या नातेवाईकांना कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही यावेळी जनार्दन यांच्या  नातेवाईकमित्रपरिवार यांनी दिला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here