तुम्ही फक्त हाक द्या ,मी गावविकासाला साथ देईन _भाजपा जिल्हाध्यक्ष – केदा आहेर

0
20

परखड, दमदार, निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीचे निर्भिड” फास्ट ” महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा. तसेच _

* * महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा : संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज : 9158417131

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नरेश सुदागोनीवार , देवळा / योगेश पवार ,लोहणेर _ येथील ग्रापंचायत तर्फे विविध विकास कामांचे उद्घाटन भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लोहोणेर गावातील माळीवाडा काँक्रिटीकरण , कमला देवी मंदिर सुशोभीकरण व व काँक्रीटीकरण ,कोळीवाडा कानिफनाथ मंदिर परिसर काँक्रिटीकरण ,ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण आणि सुशोभीकरण ,बाजार स्थळी स्वच्छता लयाचे 10 गाळे बांधने आधी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी केदा नाना आहेर यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी गावाच्या विकासाची सूची तयार करून गावातील प्रलंबित कामे मार्गे लावावीत असे सांगून तुम्ही फक्त हाक द्या मी गाव विकासाला साथ देईन असे अभिवचन आहेर यांनी याप्रसंगी दिले. कार्यक्रमास ग्राम विकास अधिकारी खैरनार ,सरपंच पूनम पवार , ग्रामपंचायत सदस्य रतीलाल परदेशी ,अनिल बापू आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रसाद देशमुख ,पंडित पाठक यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here