अलर्ट : येत्या काळातही महाराष्ट्राला ढग फूटींचा सामना करावा लागेल _ प्रा.किरणकुमार जोहरे

0
22

 

परखड,दमदार,निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस उतरलेले प्रगतीचे एक निर्भिड फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क साधावा तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येणार आहे इच्छुकांनी संपर्क साधावा : संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

महाराष्ट्र न्यूज : नाशिक _  ढगफुटी व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री व जागतिक हवामान संघटनेला दिली महाराष्ट्रातील १०१ पेक्षा जास्त ढगफुटींची माहिती*

 

*१०१ पेक्षा जास्त ढगफुटींच्या महापूराने कोसळला महाराष्ट्र!*

 

*ढगफुटींच्या ‘हिटलिस्टवर’ महाराष्ट्र!*

 

*आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ व हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे संशोधन निष्कर्ष व वैज्ञानिक विश्लेषण*

 

*डॉप्लर रडारने ढगफुटींची अचूक सुचना देणे शक्य:आंतरराष्ट्रीय ढगफुटी व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे*

 

*डब्ल्यूएमओच्या मापदंडानुसार १०१ पेक्षा जास्त ढगफुटींची हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली माहिती!*

 

*मान्सून पॕटर्न बदलतोय; जून मध्येच प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिला होता अलर्ट!*

 

*डब्ल्यूएमओनुसार कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ‘ढगफुटी’आणि येणारे पूर म्हणजे ‘फ्लॅशफ्लड’!*

 

पुणे/कोल्हापूर /औरंगाबाद /नाशिक :

*महाराष्ट्र राज्यात कमी वेळात झालेला पाऊस म्हणजे वर्ल्ड मेटियरोलाॅजीकल आॅर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) च्या जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या मापदंडानुसार ढगफुटी (क्लाउडबस्ट) आणि आलेले पूर म्हणजे फ्लॅशफ्लड असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी व हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री निर्मला सितारमन, भारत हवामान शास्त्र विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम) आदींबरोबरच वर्ल्ड मेटियरोलाॅजीकल आॅर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) अर्थात जागतिक हवामान संघटनेला थेट संपर्क साधून महाराष्ट्रातील दोन दिवसात झालेल्या १०१ पेक्षा जास्त ढगफुटींची (Cloudbursts) त्यामुळे निर्माण झालेले महापूर (Flashfloods) यादी आणि याबाबतीत संशोधन निष्कर्ष तसेच वैज्ञानिक विश्लेषण आदी माहिती मानवजातीच्या कल्याणासाठी ( For the welfare of Human Civilization) , राष्ट्रीय हितासाठी व जनहिताकरीता (Nation Intrest and Public Intrest) भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी कळविली आहे.*

 

आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे १५ मिनिटात २५ मिलीमिटर किंवा एक इंच किंवा ३० मिनिटात ५० मिलीमिटर किंवा दोन इंच किंवा ४५ मिनिटात ३ इंच किंवा ७५ मिलीमिटर किंवा एक तासाच्या कालावधीत १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक दराचा पाऊस म्हणजे ढगफुटी होय. भारत हवामान विभाग (आयएमडी)च्या वेबसाईटसह २०१० सालापर्यंत उपलब्ध असणार्‍या व्याख्येनुसार १०० मिलीमीटर प्रतीतास या दराने कोसळणार्या पावसाला ढगफुटी म्हणजे ‘क्लाउडबस्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक शोधनिबंध व अहवालात आहे. डेन्मार्क, यूके, यूएस, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतासह इतर अनेक देशांतील संशोधक ढगफुटी म्हणजे ‘क्लाऊडबर्स्ट’ या शब्दाचा वापर आपल्या वैज्ञानिक शोधनिबंधात करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जातो अशी माहिती देखील भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.

 

महाराष्ट्रात गुरुवार व शुक्रवार या अवघ्या दोन दिवसात १०१ पेक्षा जास्त ढगफुटीं झाल्याची माहिती भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. कोकण, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा सर्व ठिकाणी ढगफुटी या दोन दिवसात झाल्यात. प्रा किरणकुमार जोहरे हे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम) पुणे चे माजी हवामान शास्त्रज्ञ असून ४ आॅकटोबर २०१० रोजी पाषाण पुणे येथे झालेल्या ढगफुटीची ९० मिनिटात १८२ मिलीमिटर पाऊस) सुचना प्रशासनाला देऊन त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले होते. ज्याची दखल आजही आंतरराष्ट्रीय सायंटिफिक कम्युनिटी विविध रिसर्च पेपर, सायंटिफिक बुक्स व इतर सायंटिफिक लिट्रेचर मध्ये विविध भाषेत घेतली जात आहे.

 

तसेच सन २०१४ साली महाराष्ट्रात २९ जिल्ह्यातील गारपीटीची अलर्ट, यानंतर २०१३ ची गडचिरोली ढगफुटी व १९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता नाशिक जिल्ह्य़ातील चार ढगफुटींची सूचना व अलर्ट त्याच दिवशी होण्याआधी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ व हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिला होता. दिला होता. तसेच यावर्षी १ जूनला पश्चिम महाराष्ट्रातील कराड व सातारा तसेच मराठवाड्यात जालना व औरंगाबाद ढगफुटींचा अलर्ट होण्याआधी ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे दिला होता.

 

*अतिवृष्टी व महावृष्टी यांना जागतिक मान्यता नाही*

 

अतिवृष्टी, महावृष्टी, अतिमहावृष्टी व महाअतिवृष्टी असे अशास्त्रीय शब्द  वापरले जातात. या शब्दांना जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) मान्यता दिलेले नाही कारण हे शब्द अशास्त्रीय, गोंधळ निर्मान करणारे, सदोष व अपूरी माहिती देणारे  आहेत अशी माहिती देखील आंतरराष्ट्रीय ढगफुटी व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.

 

*ढगफुटींमुळे कोसळत आहेत दरड*

 

ढगफुटी व फ्लॅशफ्लड म्हणजे कमी वेळात येणारे पाणी यामुळे खडक कमजोर व ठिसूळ बनत भेगात पाणी शिरून पाण्याच्या दाबायला सहन नहकरू शकल्याने दरड कोसळत महाराष्ट्रात भुस्सख्खलन होहत आहे असे वैज्ञानिक विश्लेषण देखील भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले. ढगफुटींच्या पावसाने मुरलेले पाणी यामुळे पाया कमजोर झाल्याने अनेक घरे व इमारत कोसळत आहेत व लोक गतप्राण होत आहे म्हणून आपत्ती व्यवस्थापनात जनजागृती महत्वाची आहे. तातडीने जनावरांचे मृतदेह हलवून रोगराई व रोगांची साथ दाळता येईल असे ही प्रा किरणकुमार जोहरे यांनी जनहितासाठी सांगितले.

 

*येत्या काळात ही महाराष्ट्राला ढगफुटींचा सामना करावा लागेल!*

 

मान्सून पॅटर्न बदलला आहे. महाराष्ट्र हा ढगफुटींच्या हिटलिस्टवरती आहे. १२ जूलै २०२१ रोजी हिमाचल प्रदेश मध्ये धर्माला, कुलू आणि कांडला याठिकाणी ढगफुटींमुळे मोठे नुकसान झाले आणि अनेक जण बेपत्ता व गतप्राण झाले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात देखील उस्मानाबाद (९ जुलै रात्री ९ च्या सुमारास), अमरावती (१२ जुलै सकाळी साडे पाच वाजता), परभणी (१२ जुलै रात्री साडेसात वाजता) अशा जुलै महिन्यात सलग पश्चिम विदर्भ व मराडवाडयातील दुष्काळी प्रदेशात ढगफुटी झाल्या आहेत. उत्तराखंड मधील नैनितालसह इतर अनेक ठिकाणी मे महिन्यात अचानकपणे झालेल्या ढगफुटींच्या घटना या चिंता वाढविणाऱ्या आहेत. मे, जूनमध्ये नैनितालला कधीच पाऊस पडत नाही ही गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेला निसर्ग नियम यंदा मोडीत निघाला आहे. साधारणत: जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नैनितालला जलधारा बरसतात. असे असताना १२ मे २०२१ ला नैनिताल, कैचीधाममध्ये ढगफुटी झालीच कशी, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्याकडे गांभीर्याने बघत जनहितासाठी कृती करण्याची गरज आहे असे ही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

 

*… यामुळे होते आहे ढगफुटी : प्रा किरणकुमार जोहरे यांचे संशोधन निष्कर्ष*

 

सुर्यावरील घडामोडी व ग्लोबल इलेक्ट्रिक सर्किट (जीइसी) तसेच ग्लोबल मॅग्नेटिक सर्किट (जीएमसी) मध्ये खळबळ माजली आहे परीणामी महाराष्ट्रासह जर्मनी, नेदरलॅंड, चीन आदी अनेक देशांत ढगफुटी व महापूरानचे थैमान सध्या सुरू आहे आणि करोटी लोक यामुळे प्रभावित झाले आहेत. एवढेच नव्हे तर जून व जुलै महिन्यात जगभरात हजारो लोक ढगफुटींमुळे गत प्राण झाले आहेत असे आपले संशोधन निष्कर्ष प्रा किरणकुमार जोहरे यांनी मांडले.

 

सुर्याकडून येणार्या वैश्विक किरणांमुळे (काॅस्मिक रेज्) अवकाशापासून ते पृथ्वीच्या वातावरणात मोठी खळबळ होते आहे. आयनोस्फेरिक म्हणजे जमिनीपासून ९० किलोमीटर उंची पासून ते ४०० किलोमीटरपर्यंत असलेल्या वातावरणाच्या विद्युत भारीत अणुरेणूनी बनलेल्या प्लाझ्मा थरात मोठी ढवळाढवळ झाली आहे जी वैज्ञानिक भाषेत आयनोस्फेरिक सिंटिलेशन म्हणून ओळखली जाते. विजांचे प्रमाण वाढले आहे जे एखाद्या सेंसर प्रमाणे दर्शविते आहे की, हार्ड व साॅफट एक्स रेज (क्ष किरण) च्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अणू रेणू हे विद्युत भारीत होऊन आयनायझेशन होत वातावरणात अचानक भवर्यांसारखी परीस्थिती निर्माण होत आहे. परीणामी आर्द्रता, तापमान, हवेचा दाब यांच्यात चढ उतार होत  वातावरणात अस्थिरता निर्माण होते. प्रचंड अस्थिरता आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जटिल भौतिक व रासायनिक प्रक्रियांचा परीपाक म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी होय. अचानक महाराष्ट्रात ढगफुटींनी दोन दिवसांत शंभरी पार झाली आहे असे ढगफुटीं मागचे शास्त्रीय कारण देखील भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. सौर डाग, ग्लोबल इलेक्ट्रिक सर्किट (जीईसी), मॅग्नेटोस्फिअर मधील मोठे बदल होत आहेत जे सखोल अभ्यासने गरजेचे आहे असे ही प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले.

 

नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा)च्या ट्रिम (ट्रॉपिकल रेनफाॅल मेजरींग मिशन) उपग्रहाने तसेच द साऊथ एशियन नेटवर्क फाॅर डॅमस्, रिव्हर्स एंड पीपल (एसएएनडीआरपी) या संस्थेने झालेल्या  शेकडो मिलीमिटर पावसाची जुनी आकडेवारी देखील चिंताजनक आहे हे आपण शेती, शेतकरी व राज्य तसेच भारतीय अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी गांभीर्याने घेतले पाहिजेत असे ही हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले.

 

*रडारने ढगफुटींची अचूक सुचना देणे शक्य!*

 

एक्स बॅंड डॉप्लर रडारने ढगफुटींची अचूक सुचना देणे शक्य आहे. ‘डाॅप्लर रडार’ बोटाएवढ्या पेराच्या भागामध्ये बाष्प, बर्फ आणि पाणी किती आहे. याची अत्यंत अचूक माहिती देऊ शकते. ही टेक्नॉलॉजी तैवान, जर्मनी, अमेरिका, चीन तसेच भारतामध्येही वापरले जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर मुंबई, नागपूर येथील ‘रडार’ ढग किती आहे. बाष्प आणि पाणी किती आहे त्याची अचूक माहिती देत आहेत. सध्या सुमारे ५०० किलोमीटर रेंजचे  मुंबई आणि गोवा येथील डॉप्लर रडार कोंकण कव्हर करते. आयआय टी एमचे महाबळेश्वर व सोलापूर येथील एक्स बॅंड व केए बॅंड रडार पश्चिम महाराष्ट्राला कोणत्या वेळी किती पाऊस कोणत्या अक्षांश रेखांश वर पडणार याची अचूक हवामान व पाऊस माहिती देते. नागपूर ‘डाॅप्लर रडार’ विदर्भ कव्हर करते. मात्र उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात रडारची रेंज पोहचत नाही. सह्याद्री पर्वत रांगांमुळे मुंबईच्या रडारने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अचूक हवामान माहिती देऊ शकत नाही. परीणामी शेतकरी व जनतेला अचूक हवामान व ढगफुटींची आगाऊ माहिती देण्यासाठी तसेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था व पर्यायाने राष्ट्रीय अर्थव्यवस्था शेतीने मजबूत करत लोकांचे व जनावरांचे जीव वाचविण्यासाठी तसेच वित्तहानी टाळण्यासाठी उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक मधील चांदवडच्या चंद्रेश्वर डोंगरावर तर मराठवाडय़ात औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे अंजिठा लेण्यांजवळ उंच ठिकाणी एक्स बॅंड मोबाईल डॉप्लर रडार तातडीने बसविणे आवश्यक आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र पाठवून त्यासाठी हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी विनंती केली असून त्याची योग्य दगल राज्य व केंद्र सरकार घेईल असा विश्वास प्रा किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला.

 

*आशिया खंडासाठी नोडल एजन्सी आहे भारत!*

 

जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) ही जगातील हवामानावर देखरेख करणारी संस्था असून लोकांचे जीव वाचविणे व आर्थिक हानी कमी करणे हा तीचा उद्देश आहे. त्यासाठी ही संघटना  मोठा निधी देते.आशिया खंडातील देशांत होणार्‍या’ढगफुटीं’ चा सहातास आगाऊ ‘अलर्ट’देण्याची जबाबदारी ‘नोडल एजन्सी’ या नात्याने भारताकडे गेली तीन वर्षे आहे.

 

बांगलादेश,भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड आदी देशांना भारत सहा तास आधी ढगफुटी म्हणजे कलाउडबस्टचे अलर्ट देत आला आहे. विशेष म्हणजे भारतीय यंत्रणांवर अविश्वास दाखवून पाकिस्तान या यादीतून बाहेर पडला आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय गेल्या काही  वर्षांपासून भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या भरवशावर  ‘कार्यक्षम’आहे.

भारत हवामान विभाग (आयएमडी) ने ‘फ्लॅशफ्लड (ढगफुटी) निर्देशन यंत्रणा (एफजीएसएस) उभारल्या आहेत आणि त्या सर्व प्रभावीपणे कार्यरत आहेत ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. येत्या काळात आयएमडी केवळ इतर देशांना नव्हे तर आपल्या देशातील शेतकर्यांना देखील फ्लॅश फ्लड अलर्ट’ देईल. ढगफुटींचा पाऊस पडतो आणि महापूराने लोक वाहून जात आहेत अशावेळी भारत हवामान विभाग (आयएमडी) ‘अंदाज’ नावाने अचूक हवामान माहिती प्रशासनाला २४ बाय ७ देते आहे.

 

*राष्ट्रहितासाठी यंत्रणा ताब्यात द्या, १३८ कोटीं जनतेला  अचूक हवामानाची रियल टाईम माहिती व अलर्ट देतो: आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे*

 

हवामान खात्याकडून अंदाज नव्हे तर आपल्या शिवारात, गावात, परिसरात, केव्हा – किती पाऊस पडेल, याची खरी माहिती मिळाली पाहिजे. यासाठी दबाव व वचक निर्माण होण्याकरिता शेतकर्यांनी स्वतः ठोस निर्णय व कृती करण्याची गरज आहे. आज ‘आदित्य’, ‘प्रत्युष’, मिहीर अशी १० पेट्याफाॅली पर्यंत क्षमतेचे सुपर काॅम्पुटर्स केवळ हवामान खात्याच्या दिमतीला आहेत. पण तंत्रज्ञान नवीन आणि वापरकर्ते जुने ह्यामुळे नुकसान देशाचे होते आहे.  हवामान खात्यात आपोआपच सुधारणा होईल असे मानणे म्हणजे ‘अंधश्रद्धाच’ होय. एक व्यक्ती ५० कोटी वर्षे जगला तर जेवढा विचार करु शकतो तेवढा विचार एका सेकंदात करणार करणारा १० पेट्याफ्लाॅपी म्हणजे १०,००,००,००,००,००,००,००० (एकावर सोळा शुन्य) क्षमतेचा खास हवामानासाठी वाहेलेला सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) पुण्यात आहे. जगातील १० नंबरचा अद्यावत असलेल्या या सुपर कॉम्प्युटरची क्षमता आता पाच पट वाढविली जात आहे अशी माहिती देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. आपणास संधी, स्वातंत्रासह हवामानासंबंधीत विविध उपकरण यंत्रणांचा डाटा व नियंत्रण मिळाल्यास देशातील १३८ कोटी पेक्षा जास्त जनतेला दर दहा मिनिटांनी मोबाईलवर अत्यंत अचुक व अंदाज नव्हे तर अचूक माहिती देणे आपण शक्य करून दाखवू असे ही प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

 

सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन लोकांचा जीव वावाचविण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेत विज्ञान व पारंपरिक ज्ञान तसेच नैसर्गिक बुद्धीमत्ता वापरताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा नियंत्रित व सुयोग्य वापर केला तर संपूर्ण . तैवान, जपान, दक्षिण कोरिया व अमेरिका या देशांपेक्षा आपल्या भारतामध्ये मानवी बुद्धीमत्ता उच्च प्रतीची आहे व पृथ्वीच्या पाठीवरील अद्यावत तंत्रज्ञान व प्रशिक्षित मनुष्यबळ भारतात हवामान खात्याकडे आहे हवामान खात्यावर टिंगल टवाळी करण्यापेक्षा तिचा प्रभावी वापर शेतकरी व जनतेने करून घेतला पाहिजे असे ही हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” शी बोलताना सांगितले.

__ प्रो. किरणकुमार जोहरे : 9168981939

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here