September 25, 2023

रणरागिणी फर्स्ट वुमन्स बाउन्सर फाउंडर सौ. दीपा परब यांचा कोवीड योद्धा म्हणून गौरव

1 min read

परखड, दमदार, निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस उतरलेले प्रगतीचे एक निर्भिड फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येणार आहे तरी इच्छुक असलेल्या तरुणांनी व तरुणींनी संपर्क करावा : संपर्क _ भारत पवार, मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज ,9158417131

 

महाराष्ट्र न्यूज : पुणे _  दुर्बल घटकातील सुरक्षारक्षक (बाऊन्सर) प्रशिक्षण देणारी  पहिली महिला. आजपर्यंत 600 महिला बाऊन्सर घडविण्यात यश. एकेकाळी पुण्यातील सारसबागेत वडापाव विकून जगणारी दिपाली आज अनेक महिलांना जगण्याचं बळ आणि प्रत्यक्ष काम देत आहे.  प्रदीर्घ आजारानं वडिल अंथरुणाला खिळलेले. तीन बहिणी, एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न. अशा परिस्थितीत वडापाव विकणे, छोटे-मोठे मार्केटिंगचे जॉब, सोबतच स्वत:चं, भावंडांचं शिक्षण, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करत त्यांनी खचून न जाता मार्गक्रमण सुरुच ठेवलं. आज दिपाली अनेकींची शब्दश: अन्नदात्री ठरली आहे.  दरम्यान खूप बिकट अश्या परिस्थितीत विवाह झाल्याने कुटुंबाचा, समाजाचा विरोध पत्करून पतीच्या सहकार्याने त्या निष्ठेने काम करत राहिल्या. पोलिस दलात जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण ते अधुरे  राहिले तरी त्या डगमगल्या नाही मात्र, स्वन च्या निमित्ताने का होईना मुंबईत गेल्यावर देहयष्टी पाहून त्यांना एका चित्रपटात पोलिसाची भूमिका मिळाली. तिथचं बाऊन्सरबद्दल माहिती आणि पर्यायाने जणू काही नवीदिशा मिळाली. तेथून पुन्हा पुण्यात येऊन पतीच्या क्रीडा निकेतनातून महिला बाऊन्सरचे प्रशिक्षण सुरु केले. ते ही महीलान साठी मोफतच. सुरुवातीला केवळ २४ महिला आल्या. निवडीसाठी पात्रता फक्त मजबूत देहकाठी आणि कठीण परिस्थितीशी आणि गरज असेल तेथे पुरुषांसोबतही चार हात करण्याची मनगटातील ताकद. दगडूशेठ हलवाई गणपती देखावा परिसरात २०१६ साली त्यांनी सुरक्षेसाठी १० दिवसासाठी २४ महिला बाऊन्सर सेवेत  लहान मोठ्या कामातून मिळवले सहाय्याने हजर केल्या. त्यानंतर अनेक खाजगी, राजकीय, सेलिब्रिटिंचे कार्यक्रम, वैयक्तिक सुरक्षा आदी ठिकाणी महिला बाऊन्सर्सना रोजगार दिला.  महिलांच्या हक्काच्या वारसा चे जमिनी ही मिळून दिल्या त्यांनी घडविलेल्या अनेक महिला ६०० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षितही करत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून त्या रस्त्यावर असलेल्या अनाथ, अबला आणि मनोरुग्ण महिलांना अनाथाश्रमात दाखल करणे, त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे कामही त्या करतात. हे करत असताना त्यांनी विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून ११२  पेक्षा अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मनातील विश्वास अन मनगटातील ताकदच तुम्हाला समर्थ बनविते हे त्या केवळ सांगतच नाहीत तर त्यांनी कृतीतून ते सिद्ध केलं आहे.

महाराष्ट्रात प्रथम वूमन बाउन्सर (बॉडीगार्ड) स्थापना करून स्त्रिया काय काम करू शकतात हे सिद्ध करून दाखवून दिले व स्त्रियांचा सन्मान वाढवला. आणि आताच्या भीषणcovid१९  करोना वॉरियर्स  फवारणी मारणारी पहिली महिला  महाराष्ट्रात ठरली आणि येणे जिवर बेतून पोजिटिव च्या घरात फवारणी केली आणि खूप साऱ्या पुण्यातल्या एरिया फवारणी करून सुरक्षित करायच्या जेवण करून ३०० लोकांना रोज ११० दिवस न थांबता फावरानितून शिदा गोळा करून गरजूंना जेवण पुरवणारी ही नारीशक्ती चे ये रूपच दिसले.आणि त्यातून पण त्यांना करोणा योद्धा असे खूप सारे सन्मान मिळत आहे पुढारी पेपर ने पण नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  तसेच

नुकतेच महाराष्ट्र शासनाने आणि मॅक्स वुमन ने त्यांचा कोविडच्या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा “कोविडयोद्धा” म्हणून गौरव करण्यात आला. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.