March 22, 2023

हृदयातली माणसं : आपणास मोठे करण्या साठी मला अजून काही वर्ष जगवा ,संघटना माझा श्वास ,माझे रक्त समजून काम करत आलोय _ प्रदीप ( बाबा )पाटील , खंडापूरकर

1 min read

बोलत असताना संघटनेचे सर्वेसर्वा प्रदीप( बाबा ) पाटील

परखड, दमदार, निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस उतरलेले प्रगतीचे एक निर्भिड फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क : भारत पवार, मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज,मो.9158417131.

महाराष्ट्र न्यूज : लातूर _ गेल्या अनेक वर्षांपासून मी संघटनेच्या कामास वाहून घेतले असून संघटने पाई जनतेच्या हिताची कामे करत असताना अनेक वेळा जेल ( अटक ) सुध्दा झाली.संघटना माझा श्वास व माझे रक्त समजून मी काम करतोय असे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स मानव अधिकार मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील , खंडापूरकर यांनी महाराष्ट्र सह भारतातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलतांना केले.त्यांनी यावेळी सांगितले की, संघटना ही भारतातील कानाकोपऱ्यातील खेड्या पाड्यातील जनते पर्यंत पोहचवली असून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी काय ? हे ओळखून संघटनेच्या कामास जोमाने लागा असे आवाहनही यावेळी बाबांनी केले.पुढे बोलताना

 

एकीकडे दिवसाला

शेकडो हजारो माणसं भेटतील.पण मनाच्या अंतरंगात बोलण्यासाठी कोणीचं नसावं याची सल मनाला बोचत असते.प्रत्येक मनाला व्यक्त व्हायचं असतं.पण व्यक्त होण्यासारखं समोरच्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व नसतं.मन हलकं करणारी व बोलणारी माणसं आजच्या क्षणाला जवळ हवीत.कधी कसा कोणता क्षण आणि प्रसंग माणसांवर   येईल हे सांगता येणे अशक्य आहे.

त्या प्रसंगांना आणि संकटांना निर्भिडपणे सामोरं जाण्याचं आत्मबळ देणारी माणसं जपायला हवीत .माणसाचं जवळ असणं आणि एकमेकांना जपणं आजच्या काळात खुप गरजेचं आहे.

एक वेळ पैशांनं आणि संपत्ती ने श्नीमंत असणारी माणसं जवळ नसली तरी चालेल मात्र मनाने श्रीमंत असणारी आणि संकट काळात मदतीचा हात देणारी माणसं जवळ असणं गरजेचं आहे.

माणुस म्हणुन विचार करणं गरजेचं आहे . दररोज प्रत्येक क्षणाला कित्येक माणसं भेटतात बोलतात आणि निघून जातात.रोजच्या जीवनात सकाळपासून ते रात्री उशिरा झोपेपर्यंत प्रत्येकजण हा कुणाचा ना कुणाच्या संपर्कात येतच असतो पण जीवनाच्या अडचणी संकटे समस्या तणाव चिंता कुणापुढे व्यक्त कराव्यात? याबद्दल प्रत्येक मनात प्रश्न असतै ? स्वतःचं काहितरी सांगावं व इतरांनी ऐकुन घ्यावं , असं प्रत्येकालाच वाटतं पण समोरची व्यक्ती त्या योग्यतेची आहे का? याचीही तपासणी करणे गरजेची आहे.

कित्येकांच्या मोबाईल मध्ये शेकडो हजारो नंबर असतात.पण जीवाभावाचं आणि हक्काचं बोलता यावं असा एक तरी नंबर आहे का? ज्यांच्याकडे असे नंबर आहेत त्यांचं जगणं सुखकर आणि आनंददायी होतं.हक्काचं आणि आपलेपणाचं स्थान असावं .अश्या मोबाईल नंबरच्या पलिकडचंहि व्यक्तीमत्व व मित्राचं स्थान आपल्या जीवनात असावं . मोबाईलने नव्हे तर प्रत्यक्ष भेटिनं त्यांनी आपलं दुःख समजून घ्यावं.

कसली औपचारिकता स्थळाच सभोवतलाच भान न बाळगता व्यक्त होता यायला हवं. केवळ शब्दानाच नव्हे तर नजरेनं व स्पर्शाने आपलं दुःख समजून घेता आलं पाहिजे.मनाच्या अंतरंगातील  आवरण त्याच्या भेटिनं व बोलण्यानं मोकळं व्हावं.सुखात नव्हे तर दुःखात प्रत्येक क्षणाला धावुन जाणारं असं व्यक्तिमत्त्व प्रत्येकाजवळ असावं.

 

*वयाची 65 उलटत चालली आहे,हजारो आंदोलने केली, लाखो लोकांची कामे केली, स्व:ताचा परीवार न पहाता संघटना हाच आपला परिवार समजुन कामे केली, यात स्व:तालाच विसरलो, यवढ्या आयुष्यात आपले दु:ख सांगण्या साठी कोणीच शोधल नाही,ज्याला सांगण्याचा प्रयत्न केली त्यांनी माझ्या दु:खाचा मजाकच केली, आणी तो लोकांना सांगायला आरे मी ग्रुप च्या बाहेर पडलो तर बाबानी माझे पाय धरले,आरे बाबा रडले आसे तो चवीने आणी आनंदाने म्हणत माझ्या विनंतीची चेष्टाच केली*

 

*संघटना मी माझा श्वास, रक्त समजून काम करीत आलो,पैसे कमवायची नाहीत तर जिवंत माणसेच कमवायची आहेत.  जर मी चुकीचे वागलो तर लाखो कार्यकर्त्यांचे नाव खराब होईल, म्हणून मी राष्ट्रीय अध्यक्षाचा तोरा कधीच दाखवला नाही, एक लहानसा, छोटा कार्यकर्ता म्हणूनच वागतोय आणी म्हणूनच हार, तुरे,सत्कार मी करुन न घेता, संघटनेतील माझ्या लेकरांचा सत्कार करा आसेच मी म्हणतो, सर्वांना स्टेज वर बसवुन मी मात्र जनतेत बसतो*

 

*मी कधीच कोणाचा चहा पिला नाही, 5 रुपये सुध्दा खाल्लो नाही लाच खाल्लो नाही ,आगदी प्रामाणिक वागुन संघटना मोठी केली आणी करतोय, पण हल्ली कार्य म्हणावे तसे होत नाही खुप मोठी खंत वाटत आहे, आणी कार्य कमी आणी आवास्तव बाबीची चर्चा होत आहे,”एवढ्या अवघड परिस्थितीतुन संघटना वाढवित आहे,वेळ, पैसा खर्च होत आहे,संघटने साठी गुन्हे दाखल झाली जेल भोगली सर्व त्रास सहन केला “माझी वाहवा करु नका, स्तुती करु नका, पण डिस्करेज तरी करु नका, कोणी ग्रुप मधुन लेफ्ट झाले तर मला वाटत की शरीराचा एक पार्ट निकामी झाला,आणी चांगला,लायबल कार्यकर्त्या संघटना सोडतो म्हणाला की माझे हार्टच बंद पडते आसे  वाटते. “मग एक विनंती आहे,”आहो माझे वय 65 आहे मी अजुन किती दिवस जागणार, फार थोडच काळ आहे माझा, मग मला दुखावुन माझे हार्ट बंद पाडण्या पेक्षा माझे थोडेच दिवस आहेत जगायचे”, मला आणखीन कांही वर्ष जगायचे आहे,माझ्या नजरेसमोर माझ्या संघटनेतील मुला, मुलीचे कार्य बघुन त्यांचा सन्मान करायचा आहे,त्यांना मोठे करायचे आहे, माझ्या साठी नाही पण किमान तुमच्या साठी तरी मला जगवा,मला त्रास देवु नका, माझी स्तुती करु नका पण मला भांडु पण नका*

 

*आगोदरच माझा वयात आलेला 18 वर्षाचा कै.प्रणव नावाचा मुलगा आणी मोठा भाऊ वारल्याच्या मी दु:खात आहे,आपणास मी माझा मुलगा समजतो आणी दु:ख हारवुन जातो,मग माझे जगणे फार अल्प आहे, थोडे दिवस आपणास मोठे करुन, समाजाचे काम करण्या साठी जगु धा ही आपल्या चरणी विनंती करतो*

 

*आणी म्हणूनच माझ अंतकरण मोकळे करण्या साठी, दु:ख व्यक्त करण्या साठी मला जगवा आणी ब्रीक्स मानव अधिकार मिशन, एवम अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती चे कार्य वाढवा*

 

भुतकाळात झालेल्या मतभेदांना विसरून वर्तमान काळात मनात जोडणार्या माणसांना जपता यायला हवं.अशा माणसांना जीवापाड जपता आलं की आनंदानं आणि हिंमतीने जगताहि येतं….

चला संकल्प करु ..त्या क्षणाला माणसं जवळ हवीत, मन मोकळं करण्यासाठी….

 

*प्रदीप पाटील खंडापुरकर (बाबा ) _राष्ट्रीय अध्यक्ष*

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती .तथा ब्रिक्स मानव अधिकार मिशन,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.