स्वप्नल फाउंडेशन च्या वतीने पोल्ट्री फार्म व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर संपन्न
1 min read
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती परखड व निर्भिड पणे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध करून घराघरात पोहोचविण्यासाठी तात्काळ संपर्क करा. संपर्क:_ भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज, मो.9158417131. ** तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात ” पत्रकार ” नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी वरील मोबा नं.वरती संपर्क करावा. महाराष्ट्र न्यूज , शोभा बल्लाळ ,पुणे _ येथील स्वप्नल फाउंडेशन तर्फ नुकतेच पोल्ट्री फार्म व्यवस्थापन प्रशिक्षण जय मल्हार महिला बचत गट शिक्रापूर येथील महिलांना भोसे वस्ती येथे देण्यात आले.

बचत गटाच्या अध्यक्षा सुरेखा वाळके,सचिव जोती गवारे,व सविता गवारे यांच्या मागणीवरून घेण्यात आले. यासाठी प्रशिक्षक म्हणून माननीय श्री.आरिफ सय्यद यांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने महिलांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत प्रशिक्षण दिले. शेती साठी पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्धार गटातील सौ.सविता गवारे यांनी केला आहे.त्यांचे शिक्षण बी एस सि ऍग्री झालेले असताना ही पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले आहे.त्या स्वतःबरोबर इतर महिलांना ही आपल्या सोबत घेऊन जात आहेत.
त्यांना सरपंच सेवा संघ यांच्याकडून कृषी रतन पुरष्कार मिळाला आहे.
स्वप्नल फाउडेशनचे ब्रीद वाक्य आहे की सावित्रीच्या लेकी आम्ही आता मागे नाही राहणार. संस्थेच्या अध्यक्षा सौ.शोभाताई बल्लाळ ,अनिल भुजबळ यांनी ट्रेनिग साठी प्रयत्न केले.आणि ते यशस्वी झाले. त्याबद्दल जय मल्हार बचत गटाच्या माध्यमातून स्वप्नल फाउडेशन चे आभार व कौतूक केले. संस्थेचे उद्दिष्ट च ग्रामीण व गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. संस्थेच्या वतीने ट्रेनिग घेणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन हे सविता गवारे यांनी केले.