शिवसेनेचे उदय जाधव ठरले मनवेल ( विरार) करांचे तारणहार तर मुंबई महानगर पालिका ठरली असती मारणहार ? मनपाचा ढिसाळ कारभाामुळे नागरिकांत संताप

0
27

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती परखड व निर्भिड पने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करून घरा घरात पोहच करण्या साठी संपर्क करा. … संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक ,क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

* महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार , कार्यकारी संपादक,सह संपादक,उपसंपादक , ब्युरोचीफ यांची नियुक्ती करण्यात येत आहे .इच्छुकांनी संपर्क करावा .

महाराष्ट्र न्यूज ,जगदीश का.काशीकर, मुंबई _

कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट,

 

मुंबई _ वीरार शहरातील मनवेलपाडा विभाग येथील कारगिल नगर मधील जयदीप शाळेच्या मागे *पंचशिल अपार्टमेंट लगत असलेल्या मोठ्या नाल्याची सुरक्षा भिंत कोसळली होती.* सुरक्षा भिंतीच्या बांधकाम संदर्भात *सोसायटीतील रहिवाशांनी महानगरपालिका तसेच स्थानिक सत्ताधारी नगरसेवक यांच्याकडे लेखी स्वरूपात याविषयी माहिती दिली.*

 

पण तरीही काम होत नसल्याने *रहिवाशांनी याविषयी मनवेलपाडा येथील शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय येथे धाव घेऊन श्री.उदय अ. जाधव यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडली.* या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन *शिवसेना उपशहरप्रमुख श्री.उदय अ. जाधव यांनी महानगरपालिकेकडे त्वरीत पाठपुरावा केल्यानंतर स्व:ता आयुक्तांचे आदेशाने अभियंत्यांमार्फत नाल्याची पाहणी करून कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार* असल्याचे महापालिकेकडुन सांगण्यात आले होते परंतु

 

मागील ०३ महिने झाले तरी कामकाजाची सुरुवात केली गेली नसल्याने अचानक झालेल्या अतिवृष्टी दरम्यान डोंगरातुन वाहुन येणार्या पावसाच्या पाण्याने  *उर्वरित सुरक्षा भिंत देखील खचून पडुन गेल्यामुळे आजुबाजुच्या इमारतींना धोका निर्माण झाला होता.*

 

त्या विषयाची गंभीर दखल घेत *इमारती मध्ये राहणार्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये* म्हणुन महानगर पालिकेकडुन करण्यात येणार्या कामाची वाट न पाहता *विरार शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख श्री. उदय अरुण जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेनेने स्वखर्चाने नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे कामकाजास सुरुवात करून काही दिवसातच नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम पूर्ण केले.*

 

अशा प्रसंगात *स्थानिक रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याने पंचशील अपार्टमेंट सोसायटीतील बि.नं.०२,०३,०४,०५ या सोसायटीतील रहिवाशांनी शिवसेनेचे व श्री.उदय अरुण जाधव यांचे जाहीर आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here