कुंपणच शेत खाते हि म्हण खरी ठरली,पोलीस दलातील इज्जत चव्हाट्यावर आली , सहा.पोलीस उपनिरिक्षक यांचा घणाघात ,पोलीस दलाचे गुन्हेगारी करण्यात सर्वात मोठे योगदानात राजकारण्यांचा खरा हात _ सुनील टोके
1 min read
* नियुक्ती करणे आहे _ मुंबई शहरातील प्रत्येक महानगरात तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात / तालुक्यात पत्रकार ,उपसंपादक ,कार्यकारी संपादक,सह संपादक ,बुरो चीफ आदींच्या नियुक्त्या करणे आहेत ,तसेच आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती निर्भिड व सडेतोड पने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क करा.. संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.

जगदीश का.काशीकर ,मुंबई _
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार* महाराष्ट्र
मुंबई _ कुंपनच शेत खाते पूर्वजां पासून चालत आलेली म्हण खरी ठरली असून याचा प्रत्यय चक्क मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील टोके यांना आल्याने पोलीस दलाची इज्जत चव्हाट्यावर आल्याने मोठी खळबळ माजली आहे ,याबाबत टोके यांनी राज्यातील मंत्री महोदय यांना प्रसिध्दी माध्यमाच्या निवेदनाद्वारे सांगितले की ,
मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, मा.गृह मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, मा.उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांना ,
मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार,मनमानी कारभार, गुन्हेगारी जगताशी संबंध असणाऱ्या काही ठराविक सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील म पो से पदांवरील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यावर आपला वरदहस्त असल्याची अनेक उदाहरणे वयक्तिक माझ्यास कडे नक्कीच उपलब्ध आहे.पोलीस दलाचे गुन्हेगारी करण करण्यात सर्वात मोठं योगदान कोणाच असेल तर आपल्या राजकारण्यांच्या पाठबळा शिवाय हे शक्य नाही हे माझे ठाम मत आहे.असे सुनील टोके यांनी म्हटले असून टोके हे मुंबई पोलिस दलात मुख्य नियंत्रण कक्षात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक म्हणून सद्या कार्यरत आहेत.
आता यातली गंभीर प्रकरणातील भ्रष्टाचार कारभार करणाऱ्या पोलीस निरीक्षक आनंद भोईर, तात्कालिन नेमणूक गुन्हे शाखा मुबंई, सद्याची नेमणूक पूर्व नियंत्रण कक्ष मुंबई व दहिसर परिसरातील आनंद ढाबा याचे मालक यांच्या कारनाम्या कडे येऊ या पोलीस निरीक्षक आनंद भोईर याना 22 लाख रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले होते.
मात्र या गंभीर प्रकरणांत त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले मात्र तो खटला मे न्यायालयात दाखल असल्याने त्याचा निकाल न लागल्याने,विशेषतः मुंबई, महाराष्ट्र राज्य पोलीस दल, व इतर शासकीय विभागात नोकरी करणारे व जे भ्रष्टाचार कारभारात लिप्त असून अशा भ्रष्टाचार लोकसेवक यांना भ्रष्टाचार करताना पकडल्या नंतर त्यांच्यावर बडतर्फ कारवाई करण्यात आलेली नाही मग माझ्यावरच का?हा रोकडा सवाल पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांनी या व्यवस्थेतील सर्वाना च विचारला असून तो येथील मे न्यायालय यांना ही विचारला आहे आणि त्यांच्यावर झालेली बडतर्फ कारवाई योग्य नाही हे ही त्यांचे म्हणणे आहे शिवाय त्यांनी ठाणे मुंबई कार्य क्षेत्रातील अनेक क्लीस्ट गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने केलेला असून ट्रॅक रेकॉर्ड अतिशय उत्कृष्ट,कामगिरीचा आहे त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली बडतर्फ ची कारवाई नियमांचे उल्लंघन करणारी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेले आहे एकंदरीत पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार/सनदी अधिकारी यांच्यावर बडतर्फ कारवाई करणे नियमबाह्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे
याच बृहन्मुंबई पोलीस दलातील मा.पोलीस सह आयुक्त (प्रशासन) श्री राजकुमार जी व्हटकर यांनी सांगितले की सदर पोलीस निरीक्षक आनंद भोईर याना पुन्हा पोलीस दलात रुजू करण्या करता मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचा कायदेशीर विरोध होता परंतु तत्कालीन मंत्री रणजित पाटील यांनी पोलीस निरीक्षक आनंद भोईर याना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करण्याच्या कार्यप्रणाली ला संमती दिल्याने पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा पोलीस दलात सन्मानाने घेण्याची तजवीज करून आदेश दिले त्यामुळे त्यांना पोलीस दलात रुजू केले आहे.
वरील सर्व मा.मंत्री महोदय, राज्य शासन यांना विनंती की, 22 लाख रुपये लाच घेणारे पोलीस निरीक्षक आनंद भोईर हे जर तुमच्या व कायद्याच्या नजरेतून पारदर्शक शिक्षेस पात्र नसतील तर?प्रामाणिक,कर्तव्य कठोर,इमाने इतबारे शासकीय नोकरी करणारे पोलीस अधिकारी/कर्मचारी हे भ्रष्टाचार करणारे आहेत का? असा सवाल केला असून टोके यांनी खुले आव्हान केले की आपल्या सर्वाना पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करणारे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांनी पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांच्यावर 22 लाख रुपयांची लाच घेताना केलेली कारवाई खरी किंवा खोटी याची योग्य माहिती,चौकशी,तपास आपण सर्वजण करून
खरा प्रकार सर्व सामान्य जनते पर्यंत जाहीर करणार का? असे टोके यांनी म्हटले आहे . सध्या गाजत असलेले सचिन वाझे गँग प्रकरण कमी की काय म्हणून राजकीय नेते व पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभार करणारांच्या अभद्र युतीची ही कर्म कहाणी जगा समोर आणली पाहिजे या उदात्त हेतूने ही तक्रार मी आपल्या सर्वांना करत आहे याची योग्य चौकशी व योग्य कारवाई होणे करता माझी कायदेशीर तक्रार या माध्यमातून मी आपणांस व आपल्या राज्य शासन व पोलीस दलास गृह विभागास करत आहे कारण सद्या महाराष्ट्र राज्य शासन मंत्रालय मुंबई येथे तक्रार घेऊन येणाऱ्या सर्व सामान्य माणसाला प्रवेश बंदी आहे यास्तव या माध्यमातून लेखी तक्रार करत असल्याचे टोके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.