जळजळीत लेख : मोदीजी आभाराचा भार कशाला ? राष्ट्रवादी पक्षाचे” राष्ट्रवादी मासिक” आता सर्वत्र उलब्ध
1 min read
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात निर्भिड सडेतोडपणे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क करा.. भारत पवार , मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज : 9158417131

महाराष्ट्र न्यूज : जगदीश का.काशीकर ,मुंबई _
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
‘राष्ट्रवादी’ मासिकाचा जुलै महिन्याचा अंक आता वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील हे मासिक वाचकांसाठी उपलब्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटीलसाहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, खा. प्रफुल पटेलसाहेब , आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेसाहेब यांनी केलेली भाषणं या मासिकात वाचता येणार आहेत. परिवर्तनाचे शिल्पकार फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेतवरील डॉ. जयसिंगराव गायकवाड यांचा लेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केरळ राज्याचे वन व वन्यपशू संरक्षण मंत्री ए. के. शशींद्रन यांची राष्ट्रवादी मुंबई विभागीय युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अदितीताई नलावडे यांनी घेतलेली खास मुलाखत मासिकात वाचता येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे यांनी लिहिलेला मोदीजी आभाराचा भार कशाला ? हा लेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लिहिलेला खास लेख, आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेतलेल्या बैठकीसंबंधातील विशेष लेख यासारख्या विविधांगी विषयांमुळे हे मासिक वाचनीय झाले आहे.