मालेगावच्या त्या कर्मचाऱ्यांना आता ना “मान” ना “धन” , ” ठेक्यात ” या आणि ” ठेक्यात ” जा,मात्र मानधन महिला कर्मचाऱ्यांचा नकार , वंचित चे शिष्टमंडळ बेजार ,सफाई कर्मचारी रोजगारा पासून ” वंचित ” ?

0
34

भालचंद्र गोसावी , कमिशनर, मनपा मालेगाव

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्या साठी संपर्क करा,संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

मालेगाव _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ भारत पवार ,थेट मालेगाव मनपा तून _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनपातील मानधन वरील महिला सफाई कामगारांना अचानक पने कमी केल्याने सुमारे ३८० कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने कामगार वर्गात संतापाची लाट उसळली आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली १ जुलै पासून आंदोलन पुकारण्यात आले होते तरीही मनपा प्रशासन अधिकारी गेंड्याच्या कातडी प्रमाणे सुस्त होते.जणू काही कामगारांच्या जीवाचे आकांत पहात होते की काय ? असे वाटत होते .अशातच गेल्या शुक्रवारी दि.९ रोजी दुपारी अचानक आंदोलक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हा अध्यक्ष कपिल अहिरे , जित रत्न पटाईत , ( जिल्हा मार्गदर्शक ), जिल्हा महासचिव – संजय जगताप ,युवराज वाघ , प्रा.राजेंद्र पवार ,राजू धिवरे,मालेगाव तालुका अध्यक्ष _ सुनील अहिरे,शशिकांत पवार, सिद्धार्थ उशीरे, मुकेश खैरनार ,मनोज अहिरे,संदीप पवार,योगेश निकम , कैलास लोहार , किशोर निकम , लखन मोहिते , संतोष बोराळे आदींच्या उपस्थित आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या कार्यालयास कुलूप लावून कामगारांनी संताप व्यक्त केला.मात्र वेळेचे गांभीर्य ओळखून आयुक्त गोसावी यांनी नाशिक येथील मीटिंग आटोपून तात्काळ मालेगाव मनपात धाव घेतली तेव्हा कुठे प्रशासन अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला तर मानधन वरील कमी केलेले महिला सफाई कामगार यांनाही काहीसा धीर आला परंतु सफाई कामगारांचा धीर अगदी  क्षणिक ठरला . यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाशी आयुक्तांनी चर्चा करून वेळ निभावून नेली आणि सोमवारी ( दि.१२ ) रोजी चर्चा करू असे सांगून वंचीतचे शिष्टमंडळ आणि महिला सफाई कामगारां परत पाठवले . कालच्या सोमवारी झालेल्या बैठकीत वंचित च्या पदाधिकाऱ्यांना मनपा कमिशनर भालचंद्र गोसावी यांनी सांगितले की,मानधन वरील असलेल्या परंतु कमी केलेल्या कामगारांना ठेकेदार कडे काम करावे लागेल आणि ठेकापद्धतीत काम करणाऱ्या कामगारांचा पगार थेट बँकेत जमा होईल . कोरोना काळात काम केलेल्या तसेच साप्ताहिक सुट्टी ठेका पद्धतीत नियमानुसार ज्या सुविधा आहेत त्या सर्व लेखी स्वरुपात देऊन त्यावर अंमलबजावणी केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. परंतु सफाई कामगारांनी ठेक्यात काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याने मात्र वंचित चे शिष्टमंडळ बेजार झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. म्हणून मानधन वरील काम केलेल्या सर्व महिला सफाई कामगारांना आता ना ” मान ” ना ” धन ” मिळणार , न्यायालयीन लढाई लढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज तरी मात्र सर्व महिला सफाई कामगार रोजगारा पासून” वंचित ” होऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेला ” जोर ” ” कमजोर ” केला असे चित्र मालेगाव महानगरात झाले आहे. सुरुवातीला मात्र बहुजन समाज पार्टी ( बी एस पी ) चे ज्येष्ठ पदाधिकारी आनंद आढाव व त्यांचे सहकारी यांनी सुद्धा महिला कामगार आंदोलनास पाठिंबा देत पुढाकार घेऊन जोर धरला होता .परंतु त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी का काढता पाय घेतला ? हे गुलदस्त्यातच राहिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here