ओझर टाऊनशिप _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर गाव अतिशय सुंदर ख्याती असलेले गाव येथे एचएएल मुळे अनेक राज्यातील ,देशातील पुरुष व महिला वास्तव्यास आहेत. कै. आ.रावसाहेब कदम यांचे पासून तर मा. आ.अनिल कदम,जी.प. सदस्य यतीन कदम तर आता आ.दिलीप बनकर यांनी ओझर गावाचा कायापालट करण्याचा चंग बांधलेला असताना भरीत भर म्हणून नुकतीच ओझर ग्राम पालिकेचे ” ओझर नगर पंचायतीत ” रूपांतर करण्यात आले. आणि मुख्याधिकारी म्हणून अधिकारी सुद्धा बसविला गेला.अशा मुख्याधिकारी असलेल्या आणि एच ए एल मुळे देशात _ विदेशात नव्हे तर जगात ख्याती असलेल्या ओझर गावी ऐक_दोन नव्हे तब्बल तीन ठिकाणी मटक्याचा धंदा सर्रासपणे जोरदार चालविला जातो हे गावाच्या आणि पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीने किती दुर्दैव आहे …… वाचा लवकरच सविस्तर, या साठी गावातील सुज्ञ ,जागृत नागरिकांनी मटका अड्ड्या बाबत आपल्या प्रतिक्रया , संपादक ,” महाराष्ट्र न्यूज “मो.9158417131 ह्या नंबर वरती व्हॉट्स अप करा.
