किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्योग दर्जा प्रदीप पेशकार यांनी केंद्र सरकारचे मानले आभार

0
23

 सडेतोड व निर्भीडपणे  आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात महाराष्ट्रभर तात्काळ प्रसिद्ध करण्या साठीच क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” शी संपर्क करा .संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक ,मो.9158417131

मालेगाव _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ हरीश मारू यांचे कडून _

 

 

सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने आज रिटेल व होलसेल व्यापार यांना एम एस एम ई मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. माननीय केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता सर्व किरकोळ व घाऊक  व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे . सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मिळत असलेल्या बॅंकांच्या सवलती या सुद्धा उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने आज पर्यंत बँका रिझर्व्ह बँकेच्या प्रियाॅरिटी लेंडिंग गाईडलाईन्स प्रमाणे फक्त उद्योगांना प्रियाॅरिटी सेक्टर मध्ये लोन दिले जात होते. आता ते किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना सुद्धा उपलब्ध होईल. भारतात जवळजवळ अडीच कोटीच्या वर व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. भाजप उद्योग आघाडीची  जबाबदारी सुद्धा या दृष्टीने आता वाढली आहे. अनेक सवलती व अनेक योजना कालांतराने या क्षेत्रासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. एका अर्थाने कोरोना  काळात अडचणीत आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. नितीनजी गडकरी  यांनी संरक्षित केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पुनश्च एकदा भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व व्यापारी बंधुंचे अभिनंदन व केंद्र सरकार तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय  सुक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे भाजपा उद्योग आघाडी चे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार , प्रदेश समन्वयक रवीश मारू, नारायण दास जी मुंदडा – जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा,मालेगाव  आदींनी आभार व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here