मालेगाव : प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक,महिला व तरुणांच्या समस्या सोडविणारा खरा “युवा समाज सेवक” किरण वाघ

0
26

(समाज सेवक किरण भाऊ वाघ )

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी संपर्क करा .संपर्क _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , भारत पवार, मुख्यसंपादक : मो.9158417131

मालेगाव_ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ मालेगाव कॅम्प भागातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक , महिला व तरुणांचा पाहिजे तो विकास झालेला नाही त्यामुळे रहिवाश्यांन मध्ये नाराजी पसरली होती. गेल्या साडे तीन ते चार वर्षांपासून प्रभागातील रस्ते दुरुस्ती झालेले नाहीत तर ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रभागातील वॉर्ड वार्डातील शौलये स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे.असे असले तरी गेल्या दोन वर्षांपासून येथील समज सेवक किरण तुळशीराम वाघ हा युवा तरुण समाज हिताची कामे करत असून प्रभागातील अनेक तरुणांनी ,नागरिकांनी तसेच महिलांनी सुध्दा समाधान व्यक्त केले आहे.जनतेच्या हिताची जी कामे नगरसेवकांनी केली नसतील ती कामे किरण वाघ करतांना दिसत आहेत.त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये अनेक रहिवाश्यांच्या तोंडून किरण तुळशीराम वाघ यांचे कौतुक केले जात असल्याचे बोलले जात आहे.म्हणूनच की काय प्रभागातील अनेक तरुणांच्या तोंडी किरणभाऊ वाघ यांचे नाव घेतले जात आहे.याबत किरण वाघ यांच्या समर्थकांनी ” महाराष्ट्र न्यूज ” संपर्क करून सांगितले की, कॅम्प मधील हिम्मत नगर येथील भीम नगर वस्ती साठी १४ येप्रील निमित्ताने भरीव देणगी देऊन मदत केली.रमजान ईद निमित्त पंचशील नगर,हिम्मत नगर,शितलामाता नगर येथील जनतेस फळ वाटप केले, प्रकाश हाउसिंग सोसायटी मागील चंद्रमणी नगर येथे डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंती नमित्ताने भरीव देणगी देऊन व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ,गेल्या महाशिवरात्र निमित्ताने महादेव नगर येथे भंडारा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी पदार्थ स्वरूपात मदत केली. धम्मक्रांती चौक, कॅम्प, व प्रकाश हाउसिंग सोसायटी येथे बाबा साहेब आंबेडकर जयंती नमित्ताने देणगी देऊन सहकार्य केले तर एकलव्य जयंती निमित्ताने चंद्रमणी नगर येथे प्रसादाचे आयोजन करून देणगी दिली. तर तरुणांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन सराव पाठ शाळा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी भरीव मदत देऊन सहकार्य केले. गणेश नगर जुनी भिलाटी ( आदिवासी वस्ती) स एकलव्य जयंती निमित्त देणगी देऊन सहकार्य केले तसेच नाना विनोद देवरे यांच्या चौकास १४ एप्रिल निमित्ताने देणगी दिली. किरण भाऊ वाघ पंचशील क्रिकेट क्लब स्थापन करून अनेकदा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असते त्यासाठी भरीव निधीची तरतूद किरण वाघ करून देत असतात असेही किरण वाघ यांच्या मित्र मंडळ परिवाराने यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे कोणी व्यक्ती आजारी पडल्यास वेळी-अवेळी रात्री-अपरात्री किरण वाघ सहकार्य करत असतात तर अडल्या नडल्याना कोणत्याही कमी आपण सहकार्य करत असतो.जनतेचा विकास,प्रभागाचा विकास हेच आपले ध्येय असून समाज सेवा करण्या साठी व जनतेच्या समस्या सोडिण्यासाठी माझा जन्म असून मी पाय जमीनीवर ठेऊन प्रभागातील महिला भगिनी,ज्येष्ठ नागरिक,तरुण यांच्या समस्या सोडविणार असून कमी समस्या किंवा अडचण असल्यास अशा नागरिकांनी मला 9921649508 ह्या मो.वरती संपर्क करावा असेही आवाहन किरण वाघ यांनी यावेळी केले.तर समाज विकास आणि प्रभाग क्रमांक १ चा विकास करण्या साठी आमचे मेव्हणे राजेंद्र जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.असेही वाघ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here