मालेगाव शहरात मटका धंदा जोरात ,पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आता वरिष्ठ अधिकारी घालतील का लक्ष ? आणि गरिबांच्या घरात आणतील का आनंदाची बरसात ?

0
18

मालेगाव _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर अनेक वेळा या ना त्या कारणाने चर्चेत असतेच म्हणून अतिसंवेदनशील शहर म्हणून ह्या शहराची ओळख झाली आहे.त्यामुळे ह्या शहरात अधिकाऱ्यांना सुद्धा इमानदारीने आपले कर्तव्य अती संवेदनशील पने पार पाडावे लागते.मात्र याला गालबोट मालेगाव शहरात व कॅम्प भागातील अवैधपणे आणि बेकायदेशीर पने रुबाबात चालणाऱ्या मटका धंध्याने लावला असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसापासून हा धंदा सर्रासपणे अनेक ठिकाणी चालू असल्या मुळे याची खबर पोलिसांना का कळू नये ? याची शंका असून पोलिसांचे अर्थ पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे अनेक गरीब महिलांचे संसार मटका किंग मेकर वाल्यांनी उध्वस्त करण्यात हात भार लावला जात आहे.तर ह्या धंध्यास कुठल्याही प्रकारचे लायसन्स शासना कडून दिले तर जात नाही मग पोलिस नेमके आपले लक्ष दुर्लक्षित का करत असतात ? जनेच्या संरक्षण करणे हे आद्य कर्तव्य पोलिसांचे असून मग हेच कर्तव्य विसरणे म्हणजे मटका किंग वाल्यांना संरक्षणाची हमी च म्हणावी की काय ? असा सवाल नाराज जनतेत पडला असून आता या कामी वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधीक्षक,मालेगाव यांनी या कामी लक्ष घालून मटका पायी उध्वस्त होणाऱ्या गरिबांच्या संसार सुरळीत करून महिलांच्या संसारात आनंदाची बहर आणावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार का.महासंघाचे कार्याध्क्ष ,पत्रकार भारत पवार यांनी मीडिया द्वारे केली असून मालेगाव शहरातील आणि कॅम्प भागातील मटका धंदा कायमचाच बंद करून मटका किंग पासून गरीब महिलांच्या संसाराची होणारी अवहेलना थांबून महिलांना न्याय द्यावा असेही पवार यांनी म्हटले आहे.या कामी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वत्र निवेदन देणार असल्याचेही भारत पवार यांनी मीडिया द्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here