देवळा,मालेगाव तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले प्रशासन अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांची जीवापाड मेहनतीचे यश दिसू लागले

0
20

भारत पवार _ मुख्य संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,_

जाहिराती आणि बातम्यांसाठी संपर्क : 9158417131

देवळा / मालेगाव _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असून अक्षरशा मंत्रिमंडळ मेटाकुटीस आले आहे तर प्रशासन अधिकारी आणि राज्यातील आरोग्य अधिकारी नर्स व कर्मचारी जेरीस आले आहेत अशाही परिस्थितीत खचून न जाता धीराने तोंड देत राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि, समस्त मंत्रिमंडळ तसेच राज्यातील संपूर्ण प्रशासन अधिकारी ,आरोग्य खाते ,नर्स व कर्मचारी ह्या मारीचा सामना करत असून गेल्या आठ दिवसापासून मुंबईतील आणि इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागल्याने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ तसेच प्रशासनाधिकारी ,आरोग्य अधिकारी, नर्स व कर्मचारी यांच्या जिवापाड मेहनतीचे यश दिसू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा व मालेगाव तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू का होईना वाढू लागल्याने अधिकाऱ्यात समाधान व्यक्त केले जाऊ लागले. तर नागरिकांनी याकामी सहकार्य करून करोना महामारी कायमचे हटविण्यासाठी प्रयत्न करावेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे , तोंडास मास्क लावून सोशल डिस्टन्स वापर करावा असे आवाहन अधिकार्यां तर्फे करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी देवळा तालुक्यातील 80 कोरोना बाधित रुग्ण एकाच वेळी बरे झाल्याने तालुक्यातील अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे .यासाठी देवळाा_ चांदवड विभागाचे प्रांत अधिकारी टी.एच .देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा येथील तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ , गट विकास अधिकारी, पो. नि. देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मांडगे,डॉ.यशवंत ठोके,डॉ.कांबळे, नर्स व कर्मचारी हे जीवापाड मेहनत घेत असून संबंधित अधिकारी तालुक्यातील उमराणे ,मेशी ,दहिवड ,लोहनेर ,खालप ,माळवाडी, फुले माळवाडी ,सरस्वती वाडी, वासुळ ,मटाने, खर्डे अशा अनेक ग्रामीण भागात स्वतः भेट देऊन कोरणा रुग्णाची चौकशी करून त्या रुग्णास उपचार करत आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत नाही, रुग्णांची जास्त हेळसांड होत नाही आणि रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध होतो असेही तहसीलदार शेजुळ ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मांडगे ,डॉक्टर ठोके यांनी कसमादे टाइम्स  “महाराष्ट्र न्यूज”शी बोलताना सांगितले. त्यामुळे देवळा तालुक्यातील कोरोना रुग्ण चांगले होण्याचे प्रमाण दिसत असल्याचे वरील अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. स्वतः तहसीलदार आणि डॉक्टर प्रत्येक गावी भेट देऊन रुग्णांची विचारपूस करतात तर गावात लसीकरण ,  रुग्ण तपासणी नियमित केले जाते की नाही याचीही शहानिशा वरील अधिकारी करताना दिसून येत आहेत तर माळवाडी येथील सरपंच शिवाजी बागुल, ग्रामसेवक देवरे ,तलाठी धायगुडे आदी पदाधिकारी रात्रंदिवस बारकाईने माळवाडी गावी सेवा देत असल्याचे समजते त्यामुळे माळवाडी गावातील रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाल्याचे सरपंच बागुल यांनी सांगितले. तर मालेगाव आणि तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण सुरुवातीस खूपच वाढले असताना जनतेत खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे महामारी ने अधिकच मालेगाव तालुक्यात आपली पकड मजबूत केली होती अशातच गाफील न होता अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते एकजुटीने पुढे सरसावले यात सुरुवातीपासूनच अधिक धावपळ राज्याचे कृषिमंत्री ना. दादासाहेब भुसे हे करत आहेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचा जीव वाचवणे हे माझ्यासाठी मोठे काम आहे यासाठी शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ,कार्यकर्त्यांनी एकत्र येत महामारी चा सामना करूया असे भावनिक आवाहन दादा साहेबांनी केले होते. आज त्याचे फलित चांगले दिसत आहे दादासाहेबांच्या अथक प्रयत्नांना यश येत असून कोरोना रुग्ण चांगले होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे तर मालेगाव शहर आणि तालुक्यातील तसेच अन्य गावातील कोरोना रुग्णास ऑक्सीजन सिलेंडर तात्काळ मिळावे यासाठी सुरुवातीपासून भाजपचे नेते नगरसेवक सुनील आबा गायकवाड खूपच प्रयत्नशील होते यापूर्वी विना ऑक्सिजन मुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला होता त्यामुळे नगरसेवक सुनील आबा गायकवाड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सतत प्रयत्नशील होते आणि अलीकडेच त्यांची मेहनत फळास उतरवली मालेगावातील कोरणा रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर सुनील आबा गायकवाड यांनी प्राप्त करुन दिले असून दर तीन दिवसाआड ३०० ऑक्सीजन सिलेंडर मालेगावच्या रुग्णांना मिळणार असल्याचे सुनील आबा गायकवाड यांनी कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” शी बोलताना सांगितले. त्यामुळे कोरोना रुग्ण चांगले होण्याचे प्रमाण अलीकडच्या काही दिवसात चांगलेच दिसेल आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी कोरोना रुग्ण यशस्वी ठरेल असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. दरम्यान कोरोना रुग्णांना वेळेत आणि लवकर उपचार दिले जावेत यासाठी नामदार दादासाहेब भुसे सतत प्रयत्नशील असून त्यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे ऍड. संजय दुसाने,प्रमोद शुक्ला, माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष रामा भाऊ मिस्त्री यांचेसह अनेक पदाधिकारी मेहनत घेत असून नेहमीच कोरोना रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून रुग्णालयातील डॉक्टरांच्या भेटी घेऊन रुग्णांच्या समस्या अडचणी यावर मार्ग काढत असतात. तर मालेगाव शहरातील आणि तालुक्यातील जनतेने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करून विनाकारण बाहेर फिरणे टाळावेे अन्यथा बेजबाबदार पणे फिरणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हेे दाखल केले जातील आणि याबाबत अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशा सूचनाा दादा भुसे यांनी पत्ररकार परिष घेऊन केल्या. रुग्णांना तात्काळ उपचार केला जावा म्हणून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम,मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी ,उपायुक्तत नितीन कापडणीस ,तालुकाा आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश निकम ,सहाराचे अतिरिक्त्त शल्यचिकित्सक डॉक्टर हितेश महाले ,मनपा आरोग्यअधिकारी डॉक्टर सपना ठाकरे, डॉक्टर शुभांगी अहिरे, डॉक्टर पोतदार आदी प्रयत्नशील आहेत तसेच जनतेने लॉक डाऊन च्या काळात कोरोना चैन तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे यासाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयानंद शर्मा यांच्याा मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रजीत राजपूत , गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे तसेेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आधी प्रशासनाधिकारी जिवापाड मेहनत घेत असून मालेगाव शहरात कॅम्प विभागात पो. नि.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडकडीत बंद पाळला जात असून फालतू फिरणा -यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक पाटीील यांनी यावेळीसंपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळला जात असल्याचे दिसते. तसेच वडनेेर खाकुर्डी येथील पोलीस स्टेशनचे एपीआय मोताळे रामेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आघार रावळगाव तळवाडे यांसारख्या मोठ्या गावात कडकडीत बंद ठेवला असून त्यामुळे कोरोना साखळी तोडण्या साठी मदत होणार असून कोरोनाा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक वाढण्याचे लवकरच दिसणार अशी अपेक्षा संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त यावेळी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here