June 27, 2022

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्ती चे वय ५८ ऐवजी ६० वर्ष करावे _ मागणी

1 min read

भारत पवार , मुख्य संपादक/ संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : संपर्क –    9158417131   पुणे _ शोभा बल्लाळ _यांचे कडून राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय खात्यातील अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.त्यातच कोरोना संकटामुळे राज्याची स्थिती ढासळलेली आहे.नवीन पदाची भरती पुढील दीड वर्षे कठीण आहे.तसेच चालू आर्थिक वर्षात अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत.याचा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे.त्यामुळे सेवानिवृत्ती चे वय 58 वर्षावरून 60वर्षे केल्यास राज्य सरकारला याचा फायदा होईल,अशी अनुकूलता अर्थ विभागाने दाखवल्यानंतर राज्य सरकाने देखील यावर अनुकूलता दाखवली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.उद्योगधंदे ठप्प पडल्याने कर रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे.चालू वर्षी अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत .त्यामुळे त्यांच्या आयुष्यभराची जमपुंजी देण्यासाठी आणि नवीन भरती करण्यासाठी राज्य सरकार तेवढे सक्षम नाही.त्यामुळे राज्य सरकाने केंद्र सरकरप्रमाणे सरकारी कर्मचऱ्याचे सेवनिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करावे अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केली आहे.
राज्य सरकारच्या अर्थ विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग,गृह विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग आशा अनेक विभागातून चालू आर्थिक वर्षात अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.त्यामुळे ही रिक्त झालेली पद पुन्हा नव्याने भरणे कठीण होणार आहे.संघटनांच्या मागणीचा राज्य सरकारने विचार केला तर सरकारी तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक भार कमी होऊ शकतो.आशा वेळी अपुरे मनुष्य बळ ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काची रक्कम याचा विचार केल्यास सरकारी कर्मचारी सेवनिवृत्तीचे वय 60 वर्षे करने सरकारला दोन वर्षे पुढे सरकण्यास मदतीचा हात देणारे आहे.
कोरोना महामारीमुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्तिथी बिकट आहे.त्यामुळे जरसेवनिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास ही देणी देण्यासाठी आणखी वेळ मिळेल.अर्थ विभागाने याबाबतचा आढावा घेतला असून ,जर सेवनिवृत्तीचे वय 60 वर्षे केले तर आणखी वेळ मिळेल.अर्थविभागाने याचा आढावा घेतला असून जर सेवनिवृत्तीचे वय वाढवले तर आर्थिक बचत होईलअसे अर्थ विभागाचे मत आहे.अर्थ विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबतचे सादरीकरण केले आहे.यावर सरकाने 58 चे 60 वर्षे करण्याचा निर्णयाबाबत अनुकूलता दाखवली असून 30 एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत यावर फेरविचार होणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारमद्ये सेवनिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे.देशातील 22 राज्यामद्ये राज्य सरकारी अधीकारी आणि कर्मचारी यांच्या सेवनिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे आहे.कोरोनाची संकटामुळे आर्थिक ताण कमी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने त्यांच्या अधिकारी व कर्मचारी निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय 20 मे रोजी घेतला आहे .त्यामुळे महाराष्ट्रात ही सरकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवनिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे ,अशी अधिकारी आणि कर्मचारी संघटना करत आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी सांगितले की सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला पेन्शन, भविष्य निर्वाह निधी ग्रँज्यूटीफड इतर शासनास द्यावे लागते .त्यावर राज्यावर ताण येणार म्हणुन ही रक्कम वाचवून अनुभवी कर्मचाऱ्यांना 60 वर्षे सेवेत रुजू ठेवून कोरोनाच्या काळात त्यांच्या रुपात मिळणारा सक्षम बळाचा व अनुभवी कर्मचाऱ्यांच्या फायदा निश्चित च सरकारला नक्की होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.