कोरोनाग्रस्त मालेगाव आणि महाराष्ट्र सिरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यापासून 110 दशलक्ष लस तयार करणार ?

0
33

भारत पवार _ मुख्य संपादक / संचालक क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ जाहिरात व बातम्यांसाठी तसेच पत्रकार होण्यासाठी तात्काळ  संपर्क करा _ मो.9158417131 . मालेगाव  _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ हर्षल पवार _यांच्या कडून _ कोरोनाग्रस्त_मालेगांव_आणि_महाराष्ट्र
सिरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यापासून ११० दशलक्ष लस तयार करणार असल्याचे ऐकले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे लसीकरण एका महिन्यात होऊ शकते इतकं हे प्रमाण आहे. मात्र भारताची एकूण लोकसंख्या आणि लसींचे निर्यात होण्याचे प्रमाण बघता महाराष्ट्रात लसीकरण होण्यास किमान १ ते दीड वर्ष किमान लागतील असे दिसते.

काही दिवसांपूर्वी झारखंड चे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यातील संभाषण ऐकले त्यात गडकरी म्हणतात की ७०० कोटी ऐवजी ५००० कोटी देतो, सरकारकडे पैश्याची कमी नाही वगैरे वगैरे. भारताने त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. Road can wait but life and time cannot! लॉकडाऊन चे जरी सध्या लोक पालन करत असतील तरी हे जास्त काळ शक्य नाही. लोकांना रोजगार नाही. व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत.

सरकारने लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. त्यातही विदेशी बनावटीच्या लसी १२ पेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या लसीकरणाच्या ट्रायल मध्ये यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे पॅन इंडिया ‘मिशन इंद्रधनुष्य’ सारखी स्कीम सुरू करायला हवी. पण तत्पूर्वी आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांना लसीकरणात प्राधान्य द्यायला हवे.

आयसीएमार डायरेक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही लस घेतल्यावर कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या १० हजार नागरिकांमागे ४ आहे त्यामुळे लसीकरण हेच सध्या Best Possible Solution आहे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून भारताचे भविष्य अंधारात आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी सप्टेंबर २०२० मध्ये ऑक्सिजन ची कमतरता भविष्यात भासेल हे जाणून ऑक्सिजन चा प्लांट तिथे उभा केला, ही दूरदृष्टी प्रत्येकात नाही.

प्रत्येक जीव महत्वाचा आहे. ‘आम्ही तालुका सांभाळतो, तुम्ही चौक सांभाळा’ म्हणण्यापेक्षा ‘आपण प्रत्येक जण मिळून देश सांभाळू’ हे म्हणणं योग्य ठरेल. चौक सांभाळणारा ही सध्या देव आहे आणि तालुका सांभाळणाराही. लोकांना घरातील लोक महत्त्वाचे आहेत, त्यामुळे राजकारणाची ही वेळ नाही असं माझं मत आहे. बाकी सत्ताधारी यांनी दूरदृष्टी बाळगून योग्य निर्णय घ्यायला हवेत, लोकांचा जीव जातोय त्यामुळे प्रत्त्येक सेकंद महत्त्वाचा आहे, विरोधकांनी देखील काही चुका होत असतील तर निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.

काही चुकलं असेल तर माफ करा. पण ह्यावेळी एक नागरिक म्हणून मला कुटुंबाची, मित्र परिवाराची आणि आपली चिंता आहे. रोज भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हात कापतात, अनेक परिचित व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. आलेली परिस्थिती भयंकर आहे पण त्यावर लवकर उपाय करणे आवश्यक आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here