चित्रपसृष्टीतील विविध समस्यांचे निराकरण करणार _कनिष्क कांबळे
1 min read
भारत पवार मुख्य संपादक संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131

मुंबई ,दि.६. _ (प्रतिनिधी) मराठी चित्रपट सृष्टीत उद्भवणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून व्यापक लढा उभारून मराठी छोट्या व नवोदित कलावंतासह सर्वांची मदत करण्याचे अभिवचन डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टी.एम कांबळे गट पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी दिले.
आमदार निवास या चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी नुकतीच रिपब्लिकन भवन येथे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे व राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांची भेट घेतली, चित्रनगरीतील समस्यांबाबत तासभर चर्चा करण्यात आली.
दिग्दर्शक संजीवकुमार राठोड चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी आजवर विविध महामंडळावर सदस्य म्हनुन कार्यभार सांभाळला आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी असून डेमोक्रॅटिक रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांचे सलोख्या चे संबंध असून चित्रपट सृष्टीतील काही समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण ठरली आहे.
कलाकार तंत्रज्ञ मदतनीस व अन्य यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी सरकारला धारेवर धरून सेवानिवृत्ती नंतरचे दिवस सहजपणे जातील याकरिता उपाययोजना राबिण्यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत
काही गोष्टींची पूर्तता करवून घेत असल्याची माहितीही यावेळी कनिष्क कांबळे यांनी दिली.
मराठी चित्रपट सृष्टीत जातीभेद दिसून येत नसला तरी बहुजनांची मुलं मुली नट आणि नटी म्हनुन फारच कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे बहुजनातील युवकांनी निर्मिती क्षेत्रात उतरून नवकलाकारांना घेऊन चित्रपट काढावेत याकामी पक्षाच्या वतीने जी मदत लागेल ती पुरविण्यासाठी डेमोक्रॅटिक रिपाई पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कटिबद्ध असल्याचे मत राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.