जिल्हा एकल शिक्षकनिधी लिमिटेड बँकेची स्थापना

0
30

भारत पवार , मुख्य संपादक  / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

 

पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ शोभा बल्लाळ _  पुणे येथील  एकल शिक्षकांच्या उन्नतीसाठी बँकेची स्थापना करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंचाचे जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ खेसे व महिला अध्यक्ष पल्लवी गायकवाड यांनी दिली.
एकल टीचर्स निधी लिमिटेड बँकेची स्थापना होऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकल शिक्षकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे व बचतीतून समृद्धीकडे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील अन्य बँकांप्रमाणे सर्व सोयी सुविधा ही बँक पुरवणार असल्याची माहिती मंचाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र गरुड यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात जिल्हा पातळीवर प्राथमिक शिक्षकांसाठी मोठी आर्थिक संस्था म्हणून ही बँक कार्य करेल त्याकरता 1 एप्रिल पासून बँकेची सभासद नोंदणी चालू झालेली आहे.. जास्तीत जास्त एकल शिक्षक बांधवांनी बँकेचे सभासद होऊन बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ खेसे यांनी केले आहे.

विभागीय अध्यक्ष विकास उचाळे महिला अध्यक्षा वृषाली भंडारी, कार्याध्यक्ष मनीषा ननावरे, सुनील ढमाले, सुप्रिया आगवणे, अनिल कुमार कांबळे, दादासाहेब खेसे, राजेन्द्र गरुड, संदीप थोरात,शरद मचाले, विजय लव्हे, सुरेश राजगुरू, प्रदिप वाघोले, ज्ञानदेव सस्ते, मिलिंद चव्हाण, शफीक इनामदार,सचिव संतोष राऊत,रोहिणी निंबाळकर सर्व तालुका अध्यक्ष सदस्य याप्रसंगयाप्रसंगी उपस्थित होते. अशी माहिती इंदापूर तालुक्याचे प्रसिद्धीप्रमुख भारत ननवरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here