
भारत पवार ,मुख्य संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : 9158417131 .मालेगाव _ प्रतीनिधी _ जागतिक आरोग्य दिनानिमित्त मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या वतीने येसगाव तालुका मालेगाव येथे लसीकरण केंद्रावर जाऊन लोकांना लसीकरणाबाबत जागृत केले तसेच कोरोना बाबत काय काळजी घेतली पाहिजे ? याबाबत मार्गदर्शन केले यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्याा संख्येने लसीकरण केले यावेळी मालेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप पवार ,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील , डॉक्टर धीरेंद्र चव्हाण, डॉक्टर मिनाज पटेल, डॉक्टर किशोर बोरसे तसेच आशा वर्कर उपस्थित होते.
