विज वितरण कंपनीच्या होऊ लागल्या अवकळा ,वीज तारा खाली लोंबकळत राहिल्या वीज कर्मचारी मात्र झोपेचे सोंग घेऊन राहिला ,काही अघटीत घडले तर ?सवाल वासोळ जनतेचा
1 min read
भारत पवार, मुख्य संपादक / संचालक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131

देवळा वीज वितरण अभियंत्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे स्थानिक कर्मचाऱ्यांचे कामात निष्काळजीपणा असल्यामुळे विजेच्या लोंबकळत असणाऱ्या तारां कडे दुर्लक्ष कधी काय होईल भक्ष्य हे सांगणे कठीण संतप्त वासोळ ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रतिक्रिया ….
वासोळ : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _
देवळा तालुक्यातील वासोळ येथे असलेल्या गावतलावाजवळ विजतारा लोंबकळत आहेत व विजतारांना काटेरी झुडूपांनी देखील वेढल आहे ह्या विजतारा लोंबकळल्याने मोठा अनर्थ देखील होण्याची शक्यता आहे.तर गावात काही ठिकाणी विजेच्या तारांचा एकमेकांना धक्का लागल्याने शॉर्ट सर्किट सारखा प्रकार देखील होत आहे.या सर्व बाबींकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.काही मोठा बाका प्रसंग किंवा वाईट घटना घडेल तेव्हा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जागे होतील का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत देवळा अभियंत्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ काटेरी झुडपे काढून लोंबकळलेल्या तारा सरळ करून संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करावी किंवा वासुळ गावातून त्याची हकालपट्टी करून कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.