१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट देणार नाहीत तर शाळेत पालकांना बोलावून अपमानास्पद वागणूक राजनंदिनी गव्हाणे यांचा आरोप

0
22

भारत पवार : मुख्य संपादक /संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131

पुणे : शोभा बल्लाळ ,यांचे कडून _एकीकडे महाराष्ट्र राज्यात कोरोणा महामारीने दिवसेंदिवस विळखा घट्ट केला असून जनता भयभीत झाली आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल अशी घोषणा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री प्रा .वर्षा गायकवाड यांनी केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना मंत्री गायकवाड यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे मात्र पुण्यातील काही खाजगी संस्था चालक, मुख्याध्यापक ,प्रिन्सिपल यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांमागे फी भरण्याचा तगादा लावला असून ती न भरल्यास हॉल टिकीट दिले जाणार नाही व परीक्षेस बसू दिले जाणार नाही असे असे शाळेकडून सांगण्यात येत आहे तसेेच पालकांना शाळेत बोलावून अपमानास्पद वागणूक दिली जाते .असा आरोोप राजनंदनी गव्हाणेे यांनी केला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुुकसान होणा र असून त्यांचे भविष्य अंधकारमय होऊ नये आणि विद्यार्थी नी नैराश्य भावनेतून दीीी अघटीत असे काही करू नये म्हणून संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देऊन परीक्षेस बसूू द्यावे अशीी मागण नागरिक शेतकरी संघाच्या महाराष्ट्र राज्यय महिला उपाध्यक्ष राजनंदिनी गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here