शिव छत्रपतींचे विचार आत्मसात करण्याची गरज अभिनेते महेश सोनावणे
1 min read
भारत पवार , मुख्य संपादक / संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज,मो 9158417131 .

धायरी — क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ शोभा बल्लाळ _ यांचे कडून _
राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने तीथी नुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेता महेश सोनावणे बोलताना म्हणाले कि आपण शिवाजीराजेच्या पदपरशाने पावन झालेल्या भूमीत जन्म घेतलेले मावळे आहोत त्यामुळे त्याचे विचार आत्मसात करून जनहिताची कामे केल्यास शिवजयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल. यावेळी शिवसेनेचे नितीन वाघ, डॉ राजेंद्र भवाळकर,, दया सम्राट फाडेशेनच्या विघा हाङे देशमुख,, स्वप्नल फाडेशन सस्थापिका शोभा बल्लाळ, रामचंद्र पोळेकर ,सुरेश पोळेकर, अशोक पाटील, देवेंद्र शूर, सुनिल पवार, गणेश राऊत, सतोष कदम राजेंद्र वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराजांविषयी आपले मनोगत अभिनेते महेश सोनवणे,मा. नगरसेवक आण्णा दांगट,ड्रॉक्टर राजेंद्र भवाळकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचेआयोजन मा.नगरसेवक हरिश्चंद्र दांगट पाटील यानी तर सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले.