फिल्म सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
1 min read
भारत पवार मुख्य संपादक संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

दिल्ली _क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _शोभा बल्लाळ ,उपसंपादक _ यांचे कडून ,-
⭕केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा………
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात.
यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.
त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही मागिती दिली आहे. ”
भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना २०१९ सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे.
त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे.
” असं ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले आहेत.
रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
गेली ३० वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत.
रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून केली.
कन्नड नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली.
त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळाले यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले.
‘बिल्ला’ सिनेमाने दिली ओळख रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली.