व्यथा शेतकऱ्याची : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

0
25

भारत पवार , संपादक / संचालक _ ” महाराष्ट्र न्यूज” मो.9158417131

बागलाण कसमादे टाईम्स”  महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी:- अजय ठाकरे _

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका आणि  काही भागात आज पहाटे अवकाळीच्या पाऊसाने हजेरी लावली असल्याने उघड्यावर असलेले कांदा, हरभरा, गहू यांची नुकसान झाले सटाणा शहरसह बागलाण तालुक्यातील काही भागात मध्यरात्री प्रंचड विजेचा कडकडाट- व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परिसरात दोन ते ३ तीन दिवसांपासून उन्हाच तडाखा व मध्येच ढगाळ वातावरण दिसून येते आहे. त्यतच शुक्रवार (दि.१९) पहाटे अचानक विजांचा कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाला. तसेच दुसऱ्या दिवशी  पण उन्हाच तडाखा व लगेज ढगाळ वातावरण व विजांचा प्रचंड कडकडाट – गडगडाट आवाजानेच रिमझिम पाऊस पडतो. त्यामुळे शेतकऱ्याचे धावपळ झाली. अशा वातावरणामुळे हात-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय ? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
सध्या उन्हाळा कांदा पिक जोमात आहे. दोन महिन्यापूर्वी ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकऱ्यांनी महागडे औषधे घेऊन फवारणी केली होती. त्यानंतर पुन्हा कांदा पिकांनी उभारी घेतली. महिन्याभरापूर्वी अवकाळी पावसाने पुन्हा कांदा पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यावेळीही पुन्हा शेतकऱ्याने औषध फवारणी करून कांदा पीक जागविले. सध्या कांद्याचे बाजार भाव कमी झाल्यामुळे शेतकरी (बळीराजा) संकटात सापडला आहे.
शेतकरी दिवसरात्र पाणी भरून व काबाडकष्ट करून कांदा पिक वाचवण्यासाठी धडपड करीत असताना असे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली. उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड केली असताना सध्या बाजारभाव कमी आणि त्यात असा ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताच वाढली. अचानक पडणारा बेमोसमी पावसामुळे हाती तोंडाशी आलेला घास हिरावतो होतो काय? याची चिंता शेतकऱ्याला होत आहे.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया:- शांताराम ठाकरे, शेतकरी, (वड्याचे पाडे)
पाच हजार रुपयाने किलोने काळा उळे घेऊन दोन वेळा खराब झाले. शेतकऱ्याने तिसऱ्यांदा बियाणे टाकून कांदा लागवड करावी लागली. त्यातही करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता असे अस्मानी संकटा यामुळे कांदा पीक कसे येईल आणि बाजार भाव किती मिळेल याची चिंता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here