March 22, 2023

शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मनसेच्या पाच शाखांचे उद्घाटन प्रचंड गर्दीत संपन्न

1 min read

नवीमुंबई : दि.२१. क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज” नेटवर्क _ सचिन कदम _

 

रविवारी, २१ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत पाच शाखांचे उदघाटन शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे, मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसे सरचिटणीस रिटा ताई गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नवी मुंबईत प्रत्येक आठवड्यात नवीन शाखा उघडत आहेत. त्याचाच भाग म्हणून सानपाडा , नेरुळ सेक्टर -८, नेरुळ सेक्टर -१० , कोपर खैरणे, दिघा येथे मनसे शाखांचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

सानपाडा येथे शहर सचिव विलास घोणे, सह सचिव दिनेश पाटील, माजी विभाग अध्यक्ष आनंद चौगुले, विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या शाखा उदघाटन प्रसंगी मोठ्या संख्येने सानपाडावासीय उपस्थित होते. मनसेचे पदाधिकारी शाखा नसताना सुद्धा चांगले काम करत होते. आता शाखा उघडल्यानंतर जनतेला येथे न्याय मिळेल अशी अपेक्षा शर्मिला वहिनी ठाकरे यांनी व्यक्त केली. नेरुळ, सेक्टर-८ येथे मनसेच्या विधी विभागाचे शहरसंघटक ऍड. निलेश बागडे यांनी नवीन शाखा सुरु केली. या शाखेचे उदघाटन करताना शर्मिला वहिनी ठाकरे यांनी “आमच्या प्रत्येक नेत्यांवर अनेक केसेस असतात. त्यामुळे असे वकील असणे हि पक्षासाठी महत्वाचे आहे”, अशी मिश्किल टिपण्णी केली. नेरुळ, सेक्टर-१० येथे अमर पाटील यांनी पक्षाची नवीन शाखा सुरु केली. उपस्थित नागरिकांचा उत्साह बघून महानगरपालिका निवडणुकीनंतर अमर पाटील विजयाचा पेढा नक्की देतील अशी अपेक्षा शर्मिला वहिनी ठाकरे यांनी व्यक्त केली.

त्यानंतर शर्मिला वहिनी, नितीन सरदेसाई आणि रिटा ताई गुप्ता यांच्या हस्ते नेरुळ येथील वंडर पार्क येथे मनसेच्या पालिका कर्मचारी सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कोपरखैरणे येथे मनसेचे उपविभागअध्यक्ष प्रतिक घालमे यांनी पक्षाची नवीन शाखा स्थापन केली. यावेळी शर्मिला वहिनी ठाकरे यांनी नवी मुंबईत सतत कार्यरत असणाऱ्या शहरअध्यक्ष गजानन काळे आणि नवी मुंबई मनसेचे कौतुक केले.

शर्मिला वहिनी ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी सेनेच्या गणेश म्हात्रे यांच्या गोठीवलीतील शाखेस आणि विभागअध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या चिंचपाडा येथील शाखेस भेट दिली. सोबत विभागअध्यक्ष दिलीप शिर्के यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेस भेट दिली. त्यानंतर दिघा येथे दत्ता कदम यांनी स्थापन केलेल्या शाखेचे उदघाटन हि केले. त्यावेळी शर्मिला वहिनींचे स्वागत करण्यासाठी दिघावासियांनी तुडुंब गर्दी केली होती.

नवी मुंबईतील नऊ भरगच्च कार्यक्रमांना शर्मिला वहिनी ठाकरे यांनी उपस्थित लावल्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे बाजी मारणार, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती. या सर्व कार्यक्रम प्रसंगी उप शहरअध्यक्ष निलेश बाणखिले, विनोद पार्टे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, रुपेश कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, दिनेश पाटील, शरद दिघे, नितीन लष्कर, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहरअध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार सेना शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहर अध्यक्ष सागर नाईकरे, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, दीपाली ढउल, शुभांगी बंदीचोडे, पक्षाचे विभागअध्यक्ष, उप विभागअध्यक्ष, शाखाअध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत पवार ,संपादक /संचालक , महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.