June 27, 2022

सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव च्या नवनिर्वाचित सरपंच किरण अहिरे आणि उपसरपंच बापू राज खरे यांनी पदाची सूत्रे हाती घेताच विकासकामांना केली सुरुवात

1 min read

ओझर टाऊनशिप _ क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” _ भारत पवार ,यांचे कडून _ सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड गेल्या पाच-सहा दिवसापूर्वीच झाली आणि सरपंच म्हणून किरण अहिरे तर बापूराज खरे यांची उप सरपंच म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावात मोठ्या जल्लोषात सरपंच अहिरे आणि उपसरपंच खरे यांचे स्वागत करण्यात आले. याच वेळी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज तर्फे सरपंच किरण अहिरे ,बापू राज खरे उपसरपंच यांचे व्यक्तिशः अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . ब्राह्मणगाव विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तसेच शासन दरबारी जाऊन गावात शासनाच्या विविध शासकीय योजना राबवूनघेण्याची धमक किरण अहिरे व बापू राज खरे यांच्यात असून गावाच्या विकासाला स्वतःला झोकून देणे हे आधीपासूनच बापूराज खरे आणि किरण अहिरे यांच्या रक्तात भिनले आहे. कारण सरपंच किरण अहिरे हे जनतेच्या विकासकामांसाठी कायम प्रयत्नशील असतात त्यामुळे त्यांचे जिल्हा प्रशासणा कडे जाण्याचा कायमच खटाटोप असायचा तो फायदा अहिरे हे ब्राह्मणगाव विकासाच्या दृष्टीने नक्कीच उचलणार तर बापू राज खरे हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आरपीआय पक्षात विविध पदांवर कार्यरत राहून आणि आजही ते आरपीआय( आठवले )पक्षाचे बागलान (सटाणा )तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तालुक्यातील आणि गावातील कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही समस्या असो खरे यांनी मुंबई दरबारी जाऊन चुटकीसरशी सोडविल्या आहेत. त्यामुळे बापू राज खरे यांचा प्रशासनावर चांगलाच वचक असून ब्राह्मणगाव विकासासाठी ते आपला फायदा गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या फायद्यासाठी नक्कीच करून देणार यात तिळमात्र शंका नाही कारण सरपंच आणि उपसरपंच पदाची सूत्रे हाती घेताच किरण अहिरे व बापू राज खरे यांनी प्रथम गावाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि गाव विकासाच्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली ती प्रथमतः येथील रेशन दुकानात जाऊन पाहणी केली यावेळी खराब असलेले धान्य रेशन दुकानदार वाटप करत असल्याचे निदर्शनास आले आणि हे वाटप करण्याचे काम सरपंच व उपसरपंच यांनी तात्काळ थांबविले आणि गावातील जनतेस चांगले आणि सकस धान्य पुरवठा करण्यास भाग पाडले .यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. एवढ्यावरच न थांबता गावातील समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असणार ज्या त्या समस्या त्यात या वॉर्डतील नागरिकांनी आम्हास येऊन सांगाव्यात असेही सरपंच किरण अहिरे व उपसरपंच बापू राज खरे यांनी यावेळी सांगितले तर आज रोजी जुनी पाईपलाईन साठी पर्याय पूरक जोड पाईपलाईन टाकने गरजेचे असल्याने त्या कामास तात्काळ सरपंच आणि उपसरपंच यांनी प्राधान्य देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी काम हाती घेतले आणि पूरक जोड पाईप लाईन कामाचे खोदकाम शुभारंभ सरपंच किरण अहिरे व उपसरपंच बापू राज खरे यांनी टीकाव मारून केला. यावेळी ग्रामसेवक, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_ भारत पवार ,संपादक / संचालक ” महाराष्ट्र न्यूज” मो.9158417131

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.