जनतेच्या मुळावर केंद्र सरकार उठले ,पेट्रोल , डिझेल चे भाव वाढवले ,शिवसेना आक्रमक झाली देवळा येथे रास्ता रोको आंदोलन केले
1 min read

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

देवळा / वासोळ : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” नेटवर्क_ प्रशांत गिरासे _
केंद्र शासनाने जनतेचा विश्वास घात केेला असूून निवडणुकीीीतील जनतेेस दिलेल्या वचनांची वाट लावली असून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना न परवडणारे असे प्रत्येक क्षेत्रात भाव वाढ करून जनतेस जिवंतपणी मरण यातनाा सोसाव्या लागत आहेत ,तर गरीब जनतेची झोपच उडाली आहे. केंद्र्र सरकारने नुकतेच केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळा येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येऊन पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना केंद्र शासन बघ्याची भूमिका घेत असल्याने केंद्र शासनाच्या निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने देवळा, पाच कंदील येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.करोनामुळे प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने दुपारी १२ वाजता पाच कंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी विंचूर-प्रकाशे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.रास्ता रोकोत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, माजी तालुकाप्रमुख देवानंद वाघ, शहरप्रमुख मनोज आहेर, विभागप्रमुख विजय जगताप, नंदकुमार जाधव, भारत देवरे,उपशहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण, विशाल आहेर,भास्कर पवार, आबा बोरसे, जितेंद्र भामरे, सतीश आहेर, भाऊसाहेब चव्हाण, रामदास पवार, संतोष पवार, राकेश हेमबाडे, दीपक देवरे, कौतिक निकम, जीभाऊ पवार,संजय आहेर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
* आपले नाव उज्ज्वल करा _ महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात ठाण मांडून घरा घरात पोहोचलेले राज्यातील समस्त वाचकांनी पसंत केलेल्या कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” साठी आपल्या परिसरातील घडणार्या ताज्या घडामोडी आणि इतर बातम्यांसाठी तसेच आपली जाहिरात देऊन एका मिनिटात राज्यात सर्वत्र घरा-घरात पोहोचणारे वेब चॅनल म्हणजे “महाराष्ट्र न्यूज “साठी जाहिरात देण्यासाठी तात्काळ संपर्क करा .तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्यातील गावा गावात पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे आहेत .जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी लेखनाची आवड असणाऱ्यांनी आणि पत्रकारितेत आपले नाव उज्वल करणाऱ्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन तात्काळ संपर्क करावा. संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज. मो.9158417131