आजही समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ,तरुणांना शिक्षणासाठी कवडीचीही मदत न करणारे “दानशूर “अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरासाठी हजारो-लाखो रुपयांच्या पावत्या फाडत आहेत, का ? केंद्रातील सरकार गरीब झाले का ? महागाई वाढवण्यात कमी पडले का ?_ संतोष बादाडे
1 min read
_तुम्ही धार्मिकस्थळे उभारा,
_आम्ही शिक्षणव्यवस्था उभारु आणी समाजात वैचारिक परिवर्तन घडवू..।
पुणे _ कसमादे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “विशेष _आजही खेड्यात,गावात,शहरात आपल्या आजूबाजूला गरिबा गरजू विद्यार्थी,गरजू तरुण यांना शिक्षण व्यवसायासाठी कवडीचीही मदत न करणारे दानशूर मराठे बहूजन अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरासाठी व धार्मिकस्थळासाठी हजारो लाखो रुपयांच्या पावत्या फाडत आहेत , का ? केंद्रातील सरकार गरीब झाले का महागाई वाढवण्यात कमी पडले का असा सवाल शिवश्री संतोष बादाडे यांनी केला असून आजही समाजातील गरीब व गरजूू विद्यार्थ्यांना तरुणांना शिक्षणासाठी कवडीचीही मदत केली जात नाही अशी खंत बादाडे यांनी व्यक्त केले असून तुम्ही धार्मिक स्थळे उभारा आम्ही शिक्षण व्यवस्था उभारू आणि समाजात वैचारिक परिवर्तन घडवू असे संतोष बादााडे यांनीी म्हटले .सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास,अनुभव असलेले मोजके बहूजन मराठे याला अपवाद आहेत.धार्मिकस्थळे निर्माणासाठी मनुवादी लोक अनेक माध्यमांतून वर्गणी गोळा करणार आहेत अगदी १०० रूपयांपासून सुद्धा .सावधान _,१ रुपया सुद्धा देऊ नका दानधर्म करायचा असेल तर एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी गरजू व्यक्तींच्या आजारपणासाठी खर्च करा चांगलेआशिर्वाद मिळतील… अहो गेल्या तीन महिन्यापासून दिल्लीत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले असून तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या हिताचा तोडगा केंद्र सरकार काढत नाही? पेट्रोल डिझेल चे दाम झटक्यात गगनाला भिडले अर्थात शंभर रुपये लिटर झाले , गॅॅस सिलेंडरचे भाव पंचवीस रुपयांनी वाढवले,यालाा कोणती शूर नीतीी की वृत्ती म्हणावी ? असा संतप्त्त सवाल शिवश्री संतोष बादाडेे यांनी व्यक्त केला.
ही धार्मिकस्थळे फक्त मराठा बहुजनांना मानसिक धार्मिक गुलाम बनवण्यासाठी उभी केली जातात ती पण आपल्याच पैशातून आणि दक्षिणेची मलई फक्त भट,पुरोहित वर्ग लाटतात म्हणून वर्षानुवर्षे ते उच्च वर्णीय आणि आपण नीच वर्णीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास राहिलो..।
आजपर्यंत सर्व धार्मिकस्थळे हे मराठा बहुजन समाजाच्या पैशातून उभी राहिली पण दक्षिणा मात्र भटाकडे…
राम मंदिर निधी संकलन अभियान देशभर एकदम जोरात सुरू आहे. मराठा दलित,ओबीसी अन अन्य बहुजन समाजातून वर्गणी गोळा करून मंदिर बांधले जाणार आहे. अन त्यामुळे भटा- मनुवाद्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. धर्म, देव अन मंदिरांची निर्मिती ही ब्राह्मणेत्तर समाजाची लूटमार करण्यासाठी व ब्राह्मणांचे पोट भरण्यासाठीच करण्यात आलेली आहे. बाकी काही नाही.हे अगदी उधड सत्य असताना ही समाजाला कळत नाही उलट आज पावत्या पुस्तके घेऊन गल्ली बोळातून वर्गणी गोळा करीत फिरत आहेत राम मंदिराच्या कमिटीवर वर्गणी देणाऱ्या मराठा बहुजन समाजाला कसले ही स्थान नाही,तरी ही त्यांना वर्गणी मागायला लाज व शरम वाटत नाही..
मराठा ओबीसी बहुजन लढायला मनुवादी चरायला राममंदिर ट्रस्ट एकही मराठा ओबीसी बहुजन नाहीये.
मग पैसा का देयायचा ?
१९९३ च्या रथयात्रा अडवाणी तोगडीया सिंघल यांनी त्यावेळेस ११०० कोटी रुपये लोकांकडून जमविलेले होते म्हणे त्याचे काय झाले..?
विचार करा..!
तुमच्या माझ्या गावात राम मंदिर आहे,मला नव्या राम मंदिराची गरज नाही आणि त्याने काही साध्यही होणार नाही.वर्गणीच्या नावाखाली चाललेले भावनिक आणि धार्मिक राजकारण मला मान्य नाही..!!
ज्या देशात आज सुद्धा धार्मिकस्थळे उभारणीसाठी लोक वर्गणी गोळा करतात,तिथ परिवर्तनाची कास धरून महामानवांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे वैचारिक वारस मानवहिताचे कार्य आम्ही करत आहोत.शिक्षणाची गंगा दारोदारी घरोघरी गेली पाहिजे आणि भारत देश विवेकवादी विज्ञानवादी समाजवादी झाला पाहिजे शाळा (ज्ञान सज्ञान विज्ञान आणि आज्ञान काय हे देणार स्थळ)तेच खरमंदीर (धार्मिकस्थळ)आणी येथे समाज खरा आत्मनिर्भर बनतो बंधू-भगिनीना सुशिक्षित केले तर त्यांना प्रश्न करतील ना विचारतील ना?
राममंदिरसाठी वर्गणी देणारे सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ सृष्टीसाठी छञपती शिवराय स्मारकासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी वर्गणी देताना कुठे दिसत नाहीत..३००० कोटीच्या सरदार पटेलांच्या मुर्तीसाठी वर्गणी काढायला लागली नाही,मग ११०० कोटीच्या राममंदिरासाठी वर्गणी का काढली जाते ? असो..
आजही आदिवासी पाड्यात शाळेला अजूनही धड छप्पर नाही पावसाळ्यात मुलांना खूप त्रास होतो आता मला सांगा गरज कोणाला आहे भारताचे उद्याच भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना कि रामाला,आजही कितीतरी मुले शिक्षणव्यवस्थाचा बळी गेले आहेत..
सरकार मंदीर उभारण्यासाठी देणगी गोळा करु शकते परंतु ज्या फुले दाम्पत्यांनी त्याकाळी सनातन्यांचा विरोध पत्करून लोकांना शिक्षण दिले त्यांच्या पहिल्या शाळेची झालेली दुरावस्था त्यांना दिसत नाही.फार मोठ षडयंत्र शिजत आहे.शाळेपेक्षा मंदीरांनाच जर सरकार मोठ करत असेल तर सरकारची मानसिकता लोकांना अज्ञानीच ठेवायची आहे हे स्पष्ट होत.गावी गावी खेड्यात पहा शाळेंची दूरावस्था काय झाली आहे शाळेची दूरावस्था चालेल परंतु मंदीर होणे महत्वाचे आहे.अशी विचारधारा जर सरकारचीच असेल तर हि मंडळी देशाला कुठच्या मानसिकतेकडे नेत आहेत याचा विचार होणे गरजेचे…
अशीच मानसिकता राहिलीतर देश परत एकदा अज्ञानाच्या खाईत ढकलला जाईल. येणाऱ्या पिढीच भवितव्य अशाने अंधारमय होईल एवढे नक्की.आपण घेतलेल्या शिक्षणातून जर आपल्याला चालू घडामोडीचा अंदाज बांधता येत नसेल तर त्या शिक्षणाची व्हॅल्यू शून्य म्हणावी लागेल…
आपल्याला अंधाराकडे घेऊन जाणाऱ्या विचारांना साथ द्यायची कि प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या विचारांना साथ द्यायची हे ठरवावे लागेल.कारण आज जो आपण निर्णय घेणार तो येणाऱ्या पिढीच भविष्य असणार.एवढ मात्र नक्की शूद्रांना मंदिरात प्रवेश दिला की मंदिर बाटते मग सगळ्या भारतभर गल्लोगल्ली वर्गणी देणगी मागण्यांसाठी शूद्रांच्या दारोदारी का भटकत आहेत..?
मराठा बहुजनासाठी सत्य लिखाण होण्याची गरज आहे संत गाडगेबाबा प्रबोधनकार ठाकरे बुध्द महावीर नामदेव महाराज तुकाराम महाराज छञपती शिवराय महाराज महात्मा फुले राजर्षी शाहु महाराज व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची परंपरा सर्व क्षेञात जतन करण्याची आणि वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे…
आजच शपथ घ्या कि,कुठल्याही धार्मिकस्थळाला दान देणार नाही!महात्मा फुलेंच्या शाळेच्या भिंती रडू लागल्या आणि धार्मिकस्थळाचे कळस सोन्याने मडू लागले..!
एक पाऊल वैचारिक कृतिशील परिवर्तनाकडे..
लेखक – शिवश्री -संतोष शकूंतला
आत्माराम बादाडे

जय जिजाऊ !जय शिवराय !जय भीम !
* महत्वाचे_ महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात ठाण मांडून घराघरात पोहोचलेले राज्याचे समस्त वाचकांनी “पसंत “केलेल्या कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज” साठी तुमच्या परिसरातील घडणाऱ्या घडामोडी , विविध बातम्या आणि जाहिराती साठी तात्काळ संपर्क करावा, तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावागावात पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे आहे .जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी व लिखाणाची आवड असणाऱ्यांनी आणि पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी तात्काळ संपर्क करावा. संपर्क : भारत पवार मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज, मो.9158417131