भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात बालकांच्या जीवनाशी घडला दुर्देवी प्रकार , ह्या घटनेवरून महाराष्ट्र सरकार डॉक्टरांना आणणार का वठणीवर ?

0
33

पुणे _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ न पाहिलेला जीव गेला तो गेलाच..फुगवलेल्या अस्मितांमधून फाटलेल्या व्यवस्था दिसतात का ?

देशाला च नव्हे तर संपूर्ण जगाला ” काळीमा ” फासणारी घटना महाराष्ट्रातील आरोग्य खात्यात घडली त्यामुळे समस्त सरकारी डॉकटर लोकांचे बेताल आणि स्वतःची जबाबदारीचे ” भान ” नसणे याचे ज्वलंत उदाहरण कालच्या घटनेवरून दिसते.याला कारण शासनाचा ” वचक / दबाव नसणे असेच म्हणता येईल .त्या घटने मुळे सरकारी डॉकटर किती काळजीने रुग्णाची जबाबदारीघेतात हे चव्हाटयावर आले.त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आरोग्य खात्याचे वाभाडे निघाले असून शिल्लक ठेवलेली इभ्रत बाहेर पडली.म्हणूनच शासन यांना चांगले खडसावून ठिकाणावर आणणार का ? असा सवाल पालकांनी केला आहे ? तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री सदर घटना घडलेल्या डॉकटर विरूद्ध कोणता चाप लावतात ? आणि सर्व डॉकटर विरूद्ध काय भूमिका जाहीर करतात याकडे राज्यातील पालकांचे ,बालक मातांचे व अन्य महिलांचे लक्ष लागून आहे .

आईने नऊ महिने पोटात फुला सारख जपलं,अन तिच्याच समोर स्वतःच बाळ जळताना पाहिलं.पोटच्या पोराला ताप आला तर अनेकदा झोप लागतं नाही, इथं तर पोटचा गोळा दहा आई वडिलांनी गमावला..काय वेदना होत असतील याची कल्पना सुद्धा अंगावर काटा आणते.भ्रष्टाचार एक दिवस देशाला घेऊन बुडणार स्ट्रक्चरल ऑडिट कागदावर करणाऱ्या जमाती पासून निवडून आल्यावर स्वतःला सर्वेसर्वां समजणाऱ्या जमातीने एकदा तरी स्वतःला प्रश्न विचारावा,या घटनेचे अपराधी कोण.?
जिल्हा रुग्णालयाचे जबाबदारी तिथल्या नियुक्त केलेल्या सरकारी जिल्हा आरोग्य प्रमुखावर असते.या चिमुकल्यांना जग पहाण्या आधीच सर्व काही संपवुन गेल. महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय रुग्णालयाची पाहणी केली पाहिजे गरिब माणसाला हे अधिकारी चांगल्याप्रकारे सेवा उपलब्ध करून देत नाहीत.हे निष्पाप बाळसर्वसामान्य कुटुंबातील आहेत.कोणत्या आमदार खासदार मंञ्याची नाहीत.

संपुर्ण महाराष्ट्रात जेवढे सरकारी दवाखाने आहेत त्या दवाखान्यातील निम्मे डॉक्टर हे दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरिब नागरिकांनशी मनमानी स्वभावात वागतात तसेकाय त्यांचाच बापाचा दवाखाना आहे..महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हामध्ये असे कितीतरी हॉस्पिटल मध्ये चुकीची पध्दती वापरली जाते कोठेही नियमावली नाही गव्हर्नमेंट चे ऑडिट होत नाही त्यांची मनमानी सर्वच ठिकाणी चालू असते आशा सर्व हॉस्पिटल ची चौकशी केली गेली पाहिजे..!
सर्व व्यवस्था ही पगार घेऊन काम करते. प्रत्येकाने आपले काम जरी प्रामाणिकपणे केले तरी अशी वेळ येणार नाही.पैशासाठी किंवा काम चुकार पणा करून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जो कोणी याला जबाबदार असेल त्याला ईश्वर सुध्दा माफ करणार नाही. किती जरी देव धर्म केला तरी कर्म फलातून त्याची मुक्ती होणार नाही.दानधर्म करून उपयोग होणार नाही.कुठे फेडाल हे सर्व पापे…!
आईच्या स्तनात दूध भरेल तेव्हा ते प्यायला तिचे लेकरू नसेल,बापाला गोड मुका घ्यावा वाटेल तेव्हा त्याचे लेकरू नसेल.अजून तर कपडेही नव्हते त्यांना घालण्यासाठी नुकतीच बाळुत्यात गुंडाळलेली.त्या आईबापाचे दुःख मोजण्याचे एकक अस्तित्वातच येऊ शकत नाही.जग बघण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस पोटात राहून काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या लेकरांवर काळाचा असा घाला प्रचंड दुर्दैवी आहे.लागलेली आग पाण्याने विझवाल पण लेकरू गमावलेल्या त्या माता पित्याच्या हृदयातली आग कधीच विझणार नाही.आपलं आपत्य मेल्याचं दुःख आई बापांना आयुष्यभर राहते.त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो…!
असो,यामुळे तरी निदान आपल्याला मुख्य मुद्द्यांवर बोलायला हवे हे महाराष्ट्रातील नागरिकांना समजायला पाहिजे.सार्वजनिक रुग्णालय सेवा सर्व गरिब सामान्यांना भिक म्हणून दिल्यासारखी वागणूक जनरली दिली जाते.आणि ती सेवा व्यवस्थितपणे घेण्यासारखा समाज देखील अजून डेव्हलप झालेला नाही असेल तर तो 25 % असावा.मी ज्या ज्या वेळी सार्वजनिक रुग्णालयांना भेट देतो त्या अनुभवातून हे लिहीत आहे.कुठेही थुंकणे,कुठेही जेवणे खरकटे तसेच सोडणे,या आपल्या नित्याच्या सवयी आहेत.जाऊदे, आपल्याला काय आहे त्याचं. हे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे नाहीत. चौकाचे,तालुक्याचे,जिल्ह्याचे नामांतर करणे हेच आपले मुद्दे..आपला नेता, आपली पार्टी आपल्यासाठी महत्वाचे आहे… त्यासाठी आपण असेच मरत राहू..भंडाऱ्यातली घटना इतकी इतकी त्रासदायक आहे. 9 महिने पोटात जपलेलं बाळ असं जाताना पाहून काय झालं असेल त्या आईला.. आता ऑडिट होतील,चौकशी होतील..पण आभाळही न पहिलेला जीव गेला तो गेलाच..फुगवलेल्या अस्मितांमधून फाटलेल्या व्यवस्था दिसतात का ?
हरवली ती लेकरं, हरवली ती आमची पाखरं..
अनमोल पाखरांनो.अनमोल असा जीव तुमचा रे, ह्या सृष्टीत कसा गुदमरला?
अरे हळहळला इथला संवेदनशील जीव,वेदनेने व्याकुळ झाले मानवी मन,
किंकाळ्या तुमच्या ऐकुनी..
पाझरला इथला एकेक दगड.
पण इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला,कधीही पाझर फुटणार नाही.त्यासाठी तुम्हांला वेढलेल्या आगीनेच,आता ह्या भ्रष्ट व्यवस्थेला जाळावे लागेल.

हीच शिवांजली तुम्हांला आमच्या लेकरांनो,हीच शिवांजली तुम्हांला आमच्या पाखरांनो.
तुम्हांला आमच्या अश्रूंची वंदना,
तुम्हांला आमच्या अश्रूंची वंदना.!!
– लेखक ✍️संतोष शकूंतला
आत्माराम बादाडे पुणे..

मृत बाळामध्ये कुणाचं नुकतेच जन्मलेल तर कुणाचं ८-१० दिवसाच बाळ होत,पहावत नाही हा आक्रोश आता चौकशी होईल दोषी व्यक्तींना घरी बसवतील चार दिवस चर्चा होईल व नंतर सर्व विसरतील,परत जेव्हा अशी घटना घडेल तेव्हाच या घटनेची आठवण होईल.बाकी शासन,प्रसाशन घोषणा करण्या पलिकडे काही करणार नाही.मग सत्तेवर कोणीही असो कुठलाही पक्ष असो…।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here