महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा ,मनसे ची आर बी आय कडे मागणी

0
23

 

*नवी मुंबई, क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” महाराष्ट्रात बँकामध्ये प्राधान्याने मराठीचा वापर करावा … मनसेची रिझर्व्ह बँकेकडे केली निवेदनाद्वारे मागणी

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँकामध्ये मराठी भाषा सप्ताह सुरु करावा..मनसेची रिझर्व्ह बँक च्या महाराष्ट्र राज्य मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे मागणी*

बँकांचे व्यवहार स्थानिक भाषेमध्ये प्राधान्याने व्हायला हवेत ते सामान्य नागरिकांच्या जास्त सोयीचे आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा याच्याशी सहमत आहे. आर बी आय ने १ जुलै, २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार देशातील बँकांनी त्रिभाषा सूत्री चा वापर करायला हवा. त्यानुसार महाराष्ट्र मध्ये मराठीचा वापर प्राधान्याने होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बँकेत मराठीचा वापर करावा असे ५ डिसेंबर, २०१७ रोजी परिपत्रक काढून सांगितले आहे. दोन्ही परिपत्रक खालीलप्रमाणे आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिपत्रक – DBR No.Leg.BC. 21/08.07.006/2015-16

महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक – मभावा-२०१६/प्रा.क्र.८२/भाषा-२

परंतु अनेकदा असे दिसून आले आहे कि मराठीचा वापर बँकेत होत नाही. बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मराठी बोलता येत नाही आणि समजत हि नाही.

त्या संदर्भातील २ प्राथमिक उदाहरणे खालील प्रमाणे आहेत.

 

२ डिसेंबर, २०२० रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, बेलापूर, नवी मुंबई शाखेत मयूर शिंदे नावाचा तरुण आधार कार्ड ची काही माहिती अद्ययावत करण्यासाठी आला होता. मयूर शिंदे हे कार्यालयातील संदीप गुप्ता या प्रतिनिधींशी मराठीत बोलत असताना संबंधित प्रतिनिधीने मराठीत बोलण्यास नकार दिला. तसेच उद्धट वर्तन करून हिंदी बोलला तरच काम करू अन्यथा काम करणार नाही असा पवित्रा घेतला. तसेच माझी भाषा भोजपुरी आहे, मग मी भोजपुरी बोलू का ? असे उद्धट उत्तर दिले.

काही दिवसांपूर्वी तुषार गायकर हे गृहस्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, सीवूड्स, सेक्टर -४२(अ.), नवी मुंबई येथील शाखेत गेले असता, तेथील महिला शाखा व्यवस्थापकांना मराठी बोलता येत नव्हते आणि समजत हि नव्हते. त्यांनी नम्रपणे तुषार यांना हिंदीत बोलण्यास सांगितले.

मनसेचे नवी मुंबई शहर सचिव सचिन कदम यांच्या सोबत मनसे शिष्टमंडळाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य मुख्य महाप्रबंधक श्री. जयकिश आणि
महाप्रबंधक राहुल कांबळे यांची भेट घेतली. त्यांना पत्राद्वारे खालील मागण्या केल्या.

नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातील सर्व बँकांना मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्या संदर्भात सूचित करण्यात यावे.

युनियन बँकेतील कर्मचारी संदीप गुप्ता यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मधील शाखा व्यवस्थापकांना समज द्यावी.

२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य सरकारचा मराठी भाषा दिवस असतो. फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा आठवडा प्रत्येक बँकेने मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करावा. जेणेकरून बँक कर्मचाऱ्यांमध्ये मराठी भाषेची जागृती निर्माण होईल.

रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री. जयकिश आणि राहुल कांबळे यांनी मनसे शिष्टमंडळाला आश्वासन दिले कि दोन्ही बँकेच्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होईल.

तसेच इतर दोन मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

मनसेच्या या शिष्टमंडळात शहर सचिव सचिन कदम, बेलापूर विभागअध्यक्ष भूषण कोळी, सीवूड्स उपविभाग अध्यक्ष अप्पासाहेब जाधव, भूपेन कोळी हे उपस्थित होते

♦पााहिजेेेेत _ 

मुंबई सह सर्व महानगरात तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात,सर्व तालुक्यात ” महाराष्ट्र न्यूज ” साठी पत्रकार नियुक्त करणे आहेत.इच्छुक व जनसंपर्क असणाऱ्यांनी संपर्क करावा. संपर्क : भारत पवार,मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here