नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ मराठा आरक्षनाचा विषय न्यायालयात अजून प्रलंबित असून अजून काही निर्णय झाला नाही तरीही महावितरण कंपनी मध्ये महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता भरती प्रकिया सुरू ठेवली आहे आणि आणि मराठा समाजातील उमेदवाराणा कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आले त्याच विरोधात आज महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता SEBC (मराठा आरक्षण) ला वगळून करण्यात येणार्या भरती प्रक्रियेच्या विरोधात आज 1 डिसेंबर 2020 रोजी नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाशी येथील महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन केले यावेळी अधिक्षक अभियंता यांना निवेदन देऊन महावितरण भरती प्रक्रियेत SEBC मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत डावलण्यात आलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्रक देऊन त्यांचा समावेश करावा अथवा मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत सदर भरती प्रक्रिया स्थगित करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक काटे, विजय खोपडे, विशाल पाटील, पंकज वाडकर, जनार्दन मोरे, सुरज बर्गे, विजयाताई कदम, अमर सपकाळ, अभिजित पाटील, संकेत पवार, गणेश बोरचटे, नेताजी कदम, विनोद पोखरकर, मोहन पाडळे आदी समनव्यक तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते…