मुळ कोळीवाडे गावठाण्यांचे सिमांकन प्रश्न गंभीर ? आर.पी.आय. डेमोक्रॅटिक रस्त्यावर उतरणार _डॉ.राजन माकणीकर

0
30

 

मुंबई दि.1 क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज” (प्रतिनिधी)_ आजपर्यंत कोळीवाडे गावठाण तथा आजपर्यंतचे विस्तारित कोळीवाड्यांचे सीमांकन करावे व प्रत्येक घराच्या जागेचा सर्व्हे कसरून मालमत्ता पत्रक मिळावे या प्रश्नांसाठी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष रस्त्यावर येणार असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली.

आजच्या घडीला कोळीवाड्यातील शेवटचे घर अंतिम समजुन प्रश्नाच्या संबंधित विभागामार्फत सीमांकन गावचे नकाशे तयार करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रक देण्यात यावे याकरिता एक व्यापक स्वरूपात आंदोलन करणार असल्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे केंद्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पत्रकारांना माहिती देताना पुढे असे म्हणाले की, कोळीवड्याच्या परिसरात समुद्र व खाडी लगतची जागा मासेमारी व व्यवसाय आणि त्यांच्या भविषयातील विकासासाठी राखून त्या ठिकाणी कोणतेही आरक्षण व प्रकल्प मांडू नयेत, असे केले असतील तर ते आदेश रद्द करावेत.

कोळीवड्या जवळच्या पाच नोटिकल माईल (समुद्री मिल) पर्यंतचा परिसर मच्छीमारी, जलवाहतूक, रेती व अन्य व्यवसाय करण्याचा सर्वस्वी अधिकार कोळीवडतील मच्छीमारांचाच असला पाहिजे.

सीमांकनाच्या बाहेरील 5 किलोमीटर परिघातील सरकारी जागा मच्छीमारांच्या समाज मंदिर, आरोग्य, शिक्षण आदी विकास आणि क्रीडांगणासाठी आरक्षित ठेवाव्यात.

कोळीवाड्यांच्या विकासाचा सर्वस्वी अधिकार गाव कमिटीचा असावा बृहन्मुंबई महानगरपालिका, एम एम आर डी ये, एम एस आर डी सी व अन्य सरकारी प्राधिकारने किंवा विकासक यांना प्रतिबंध असावा.

आद्य राहिवासी म्ह्णून नावारूपाला आलेल्या कोळी बांधवांनी साऱ्या जगासह आपल्या भारतातून आलेल्या सर्व धर्म व जातीय, देश-विदेशीनागरिकाना अत्यंत समुपचसराने त्यांचे स्वागत करून त्यांचा सांभाळ केला आहे.

कोळीवड्याच्या शेजारी असलेली मोकळी जागा, मासे सुकविणे व नाविन्यपूर्ण योजना, आधुनिक बंदरे, शीतगृह मैदाने, शाळा महाविद्यालये, संमाजमंदिरे यांनाच आरक्षित ठेवून मागील 2000 वर्षीच्या काळात कोळी समाजाने त्यागलेल्या आपल्याच मुंबईतील तयाच्या जागा त्यांना देण्यात याव्यात.

काही कालावधीत होणारे हिवाळी अधिवेशनात कोली बांधवांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करणार आहोत, याकामी बौद्ध धम्मगुरु पूज्य भदंत शिलबोधी, युवध्यक्ष कनिष्क कांबळे, कॅ. श्रावण गायकवाड, वसंत लामतुरे, राजेश पिल्लाई सोबत शेकडो च्या संख्येने आंदोलन उभारून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे प्रतिपादन डॉ माकणीकर यांनी केले.

नियुक्ती _ अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या” महाराष्ट्र न्यूज” वेब चॅनल साठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात पत्रकार,जाहिरात प्रतिनिधी , बुरीचिफ तसेच उपसंपादक,सह संपादक,कार्यकारी संपादक,विभागीय संपादक आदी नियुक्त करायचे आहेत इच्छुक असणारे आणि खूप जनसंपर्क असणाऱ्यांनी त्वरित संपर्क करावा.* संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक / संचालक ” महाराष्ट्र न्यूज “मो. 9158417131 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here